एकल महिला आर्थिक सक्षमीकरण कार्यक्रम संपन्न : १८५ महिलांचा समावेश**एकल महिला लाभार्थींना पन्नास शेळ्यांचे वाटप**वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड ( वे.को.लि ) नागपूर व अपेक्षा होमीओ सोसायटी गुरुकुंज मोझरी यांचा संयुक्त उलक्रम*
*एकल महिला लाभार्थींना पन्नास शेळ्यांचे वाटप*
*वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड ( वे.को.लि ) नागपूर व अपेक्षा होमीओ सोसायटी गुरुकुंज मोझरी यांचा संयुक्त उलक्रम*
अतुल कोल्हे भद्रावती :-
भद्रावती तालुक्यातील एकूण ५ गावात वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड ( वे.को.लि ) नागपूर यांच्या आर्थिक सहाय्याने व अपेक्षा होमीओ सोसायटी गुरुकुंज मोझरी ता. तिवसा जि. अमरावती यांच्या अंतर्गत विसलोन, पळसगाव, पाटाळा, कुचना व माजरी या गावात १८५ एकल महिला सोबत उपक्रम राबवित आहे. गावस्तरावर येणाऱ्या समस्या व त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी व शासनाच्या विविध योजना त्यांना सहज उपलब्ध व्हाव्यात त्यासाठी गावस्तरावर एकल महिला किसान संघटना स्थापन करीत आहे. त्यामध्ये या सर्व एकल महिलांची शेळी पालन व्यवसाय करिता निवड करून ५० लाभार्थ्यांना पहिल्या टप्प्यात शेळ्या देण्यात आल्या. पुढील उर्वरित राहिलेल्या एकल महिलांची निवड करून शेळ्या देण्यात येणार आहे.
एकल महिलांच्या सर्वागीण विकासासाठी संस्थेचा सतत प्रयत्नशील सातत्यपूर्ण विकासासाठी एकल महिला परीतक्ता, घटस्फोटीत महिला गरजू वंचित महिलांसाठी त्यांचे लाभ व त्यांचे हक्क मिळावेत या दृष्टीने पुढील कामाची वाटचाल सुरु आहे. पुरुषाची साथ नसताना या एकल महिलांना मुलाच्या शिक्षणाचा प्रश्न सतत भेडसावत असून अपेक्षा अशीच या एकल महिलांना अटी व शर्ती न ठेवता सरळ शासकीय योजनेत सामावून घेतले पाहिजे.
यासाठी कार्यरत असलेले अपेक्षा होमीओ सोसायटीचे संचालक डॉ. मधुकर गुंबळे व कार्यकर्ते दीपक तिखे, संजीवनी पवार, मनुताई वरठी, डॉ. देवानंद वरकड व विचार विकास सामाजिक संस्थेचे संचालक किशोर चौधरी, कुणाल सुलभेवार यांचे नियमित मार्गदर्शन या एकल महिलांना गावस्तरावर गाव बैठका, गृह भेटी घेवून त्यांना बळकट करण्याचे काम करीत आहे.
या पुढे चंद्रपूर जिल्ह्यात एकल महिला किसान संघटनेच्या स्थापना करून त्यांचे प्रश्न सरकार दरबारात मांडु. व येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये स्वतंत्र एकल महिलांचा जाहीरनामा सादर करू अशी ग्वाही अपेक्षा होमीओ सोसायटीचे कार्यकर्ते सोमेश्वर चांदूरकर यांनी दिली.
Comments
Post a Comment