अतुल कोल्हे भद्रावती :-
चंद्रपूर वनी आणी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी भद्रावती शहरातील सार्वजनिक गणेश मंडळाच्या मंडपांना दि. 13 सप्टेंबर रोजी प्रत्यक्ष भेट देऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले व मतदार संघातील नागरिकांना सुख व समृद्धी लाभो अशी प्रार्थना श्री गणेशाच्या चरणी केली. यावेळी त्यांनी मंडळाचे अध्यक्ष तधा इतर पदाधिकाऱ्यांची संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी व समस्या जाणून घेतल्या व प्रत्येक गणेश मंडळांना वर्गणीच्या रूपात आर्थिक मदतही केली त्याचबरोबर शहरात गणेश उत्सव साजरा करीत या उत्सवाचे सातत्य कायम राखल्याबद्दल गणेश मंडळाचे खासदार धानोरकरांनीआभार सुद्धा मानलेत यावेळी तालुकाध्यक्ष प्रशांत काळे, शहराध्यक्ष सुरज गावंडे, माजी नगरसेविका प्रतिभा सोनटक्के, शितल गेडाम, कविता सुपी ,गोरू थैम, संजय गायकवाड ,विजय भोयर, तनु शेख आधी पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
Comments
Post a Comment