प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त

वरोरा, दिनांक 15 मार्च २०२६ प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये  आचार्य पदवी प्राप्त वरोरा : मनीषा दर्शन बारसागडे यांनी जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रचंड गुणवत्तेच्या बळावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी "चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे आर्थिक व सामाजिक अध्ययन'"(सत्र २०१०-११ ते २०२०-२१) या विषयावर संशोधन केले. त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. राजेश पी कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. मनीषा नरेंद्र पाटील  हे  रमाई परिसर, बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते मूळचे चिमूर तालुक्यातील किटाडी (तुकूम) या गावातील असून त्यांचे माहेर पवनी तालुक्यातील बेटाळा( वाही)हे असून सध्या आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. या यशस्वी संशोधनाबद्दल त्यांचे पती प्रोफेसर डॉ. नरेंद्र केशव पाटील, आनंद निकेतन महाविद्...

विदर्भस्तरीय कराटे स्पर्धेत भद्रावतीतील खेळाडूंचे सुयश**सात सुवर्णपदके तथा तीन रजतपदके प्राप्त*

*विदर्भस्तरीय कराटे स्पर्धेत भद्रावतीतील खेळाडूंचे सुयश*

*सात सुवर्णपदके तथा तीन रजतपदके प्राप्त*

अतुल कोल्हे भद्रावती :-
              चंद्रपूर येथील लालपेठ येथे पार पडलेल्या विदर्भस्तरीय कुंग फु कराटे स्पर्धेत भद्रावती येथील हुतात्मा स्मारक कराटे क्लबच्या खेळाडूंनी आपला नेत्रदीपक खेळ सादर करीत सात सुवर्णपदके तथा तीन रजत प्रत्येक पदके प्राप्त केली आहे. 
सदर स्पर्धेत विदर्भातील जवळपास दोनशे स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. सदर स्पर्धेत मुलींच्या गटात साची चावरे हिने काता व फाइट प्रकारात दोन सुवर्णपदके, सोनाक्षी कोंडस्कर हिने काता व फाइट प्रकारात दोन सुवर्णपदके तर साक्षी कपाट हिने काता व फाइट प्रकारात दोन सुवर्णपदके प्राप्त केली.तर मुलांच्या गटात नैताकी बनपुरकर याने काता व फाइट प्रकारात एक सुवर्णपदक व एक रजत पदक तर शोर्धाज राय यांने काटा व फाइट प्रकारात दोन रजतपदके प्राप्त केले आहेत. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय प्रशिक्षक शितल तेलंग, राकेश दीप, संदीप चावरे, दामिनी सूर्यवंशी व आपल्या आई-वडिलांना दिले आहे. यशस्वी खेळाडूंचे शहरात सर्वत्र कौतुक केल्या जात आहे.

Comments