*नगरपरिषद प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष*
भद्रावती शहरात डेंगू चा कहर
अतुल कोल्हे भद्रावती :-
सततच्या पावसाने शहरात घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती झाली आहे. त्यात डेंगूच्या डासाचे प्रमाण वाढल्याने शहरात डेंगूच्या आजाराने थैमान घातले आहे.
शहरातील खासगी , शासकीय रुग्णालयात मोठ्या प्रमाणात डेंग्यूचे रुग्णू उपचार घेत आहेत. याकडे नगरपरिषद प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष आहे.दोन जण दगावल्याची माहिती समोर आली आहे. शहरातील दरबाण सोसायटी , संताजी नगर , गौतम नगर, श्रीराम नगर , आयुध निर्माणी वसाहत या भागात डेंगूच्या रुग्णांची संख्या जास्त आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय आसुटकर यांना विचारणा केली असता शहरी भागात जुलै ऑगस्ट या दोन महिन्यात दहा रुग्ण आढळल्याचे सांगितले ही आकडेवारी आमची असून खाजगी रुग्णालयातील आकडेवारी आमच्याकडे उपलब्ध नसते ते म्हणाले तसेच ग्रामीण भागात चंदनखेडा , कचराळा ,चेकबरांज , मांगली , जेना , सोनेगाव , कुसना येथे 16 रुग्ण आढळले उपायोजना म्हणून आमच्याकडून गप्पी मासे ' फवारणी जनजागृती अशा प्रकारची उपाययोजना करण्यात येत आहे.पावसानंतर डासाचे प्रमाण कमी होऊन हा आजार आपोआप कमी होईल असे डॉ. आसुटकर यांनी सांगितले.
डॉ. राहुल साळवे प्रसिद्ध बालरोग तज्ञ - यांना विचारणा केली असता आतापर्यंत माझ्या रुग्णालयात ऑगस्टमध्ये ४० तर 3 सप्टेंबर पर्यंत १० रुग्ण उपचार घेत असल्याचे शहरातील अन्य खाजगी रुग्णालयात हाच प्रकार असल्याचे त्यांनी सांगितले.
कॉम्रेड राजू गैणवार जिल्हा सहसचिव भाकपा - डेंगूचे प्रमाणात वाढ होण्यास नगरपरिषद जबाबदार आहे. ते म्हणाले जेव्हापासून नगरपरिषदेवर प्रशासक बसले आहे तेव्हापासून शहराच्या स्वच्छते सोबतच इतर गोष्टीकडे दुर्लक्ष होत आहे त्यामुळे शहरात डेंगू सत इतर आजारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे .
Comments
Post a Comment