नागरिकांच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधणारे निवेदन; मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा

नागरिकांच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधणारे निवेदन; मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा वरोरा, दि. १८ मार्च – शहरातील नागरिकांना येणाऱ्या विविध समस्यांचे निवारण करण्यासाठी जिल्हा शांतता समिती सदस्य तथा माजी सभापती छोटूभाई शेख यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नगराध्यक्ष अर्चना ठाकरे यांना निवेदन सादर करून मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. नगर परिषदेच्या कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात शेख यांनी नागरिकांना होत असलेल्या अडचणींचा पाढा वाचताना सांगितले की, "शहरातील हजारो नागरिक कर भरूनही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत." त्यांनी पुढील मागण्यांचे निवेदन सादर केले:   घंटागाडी सेवा – दरवर्षी ५० ते ६० लाख रुपये उपभोक्ता कर भरूनही दर १-२ दिवसांनी घंटागाडी येत असल्याने घरात कचरा साचतो. दररोज घंटागाडी पाठवावी अन्यथा कर अर्धा करावा. कीटकनाशक फवारणी – अनेक महिन्यांपासून फवारणी न झाल्याने मच्छर व विषारी जंतूंचा प्रादुर्भाव वाढला आहे. महिन्यातून दोन वेळा फवारणी करावी. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त – शहरात मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांनी अनेक न...

राज्यातील सर्वोत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय, 5 सप्टेंबर 2024 पर्यंत मंडळाने अर्ज सादर करावा.

राज्यातील सर्वोत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय 

5 सप्टेंबर 2024 पर्यंत मंडळाने अर्ज सादर करावा.

अकूंश अवथे चंद्रपूर 
   चंद्रपूर, दि. 2 : महाराष्ट्र शासनातर्फे सार्वजनिक गणेशोत्सवात जास्तीत जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभागी व्हावे, याकरिता सन 2023 पासून राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्यात येतात. त्याच धर्तीवर 7 सप्टेंबर 2024 पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवात राज्यातील सर्वोत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या स्पर्धेसाठी अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्ट 2024 पर्यंत होती. आता मात्र शासनाने अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिली असून 5 सप्टेंबरपर्यंत गणेश मंडळांना अर्ज करता येणार आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा -2024 अंतर्गत  मुंबई, मुंबई (उपनगर), पुणे, ठाणे या जिल्ह्यातून प्रत्येकी 3 व अन्य जिल्ह्यातून प्रत्येकी 1 याप्रमाणे एकूण 44 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची निवड करण्यात येणार असून त्यातून राज्यातील पहिल्या क्रमांकाच्या सर्वोत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास रुपये 5 लक्ष रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 2.50 लक्ष  व तृतीय क्रमांकासाठी 1 लक्ष रुपये, इतक्या रकमेचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तर उर्वरित 41 जिल्हास्तरीय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून प्रत्येकी रुपये 25 हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

सदर स्पर्धेत, धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलिसांकडे किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येईल. महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in  संकेतस्थळावरील पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या दि. 31 जुलै 2024  च्या शासन निर्णयात स्पर्धा निवडीचे निकष, अर्ज उपलब्ध करून  देण्यात आले आहे. सदर अर्जाच्या नमुन्यानुसार स्पर्धेत  सहभागी होऊ इच्छिणाऱ्या  सार्वजनिक गणेशोत्सव  मंडळांनी पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई याच्या Mahotsav.plda@gmail.com या ईमेलवर 5 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज सादर करावा. सदर स्पर्धेत  जास्तीत जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.


Comments