नागरिकांच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधणारे निवेदन; दिव्यांग नागरिकांचे ५% निधी थकविल्याने आंदोलनाचा इशारा; नगर परिषदेला निवेदन सादर

नागरिकांच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधणारे निवेदन;  दिव्यांग नागरिकांचे ५% निधी थकविल्याने आंदोलनाचा इशारा; नगर परिषदेला निवेदन सादर   वरोरा, दि. १८ मार्च – शहरातील मूलभूत सुविधांच्या प्रश्नांसह दिव्यांग नागरिकांचा ५ टक्के निधी थकविल्याप्रकरणी जिल्हा शांतता समिती सदस्य शेख जैरुदीन (छोटूभाई) यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नगराध्यक्ष अर्चना आशिष ठाकरे यांना निवेदन सादर करून मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. नगर परिषद कार्यालयात आयोजित बैठकीत शेख जैरुदीन यांनी सांगितले की, शहरातील हजारो नागरिक कर भरूनही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत.   दरवर्षी ५० ते ६० लाख रुपये उपभोक्ता कर भरूनही दर दोन दिवसांनी घंटागाडी येत असल्याने घरात कचरा साचतो. दररोज घंटागाडी पाठवावी अन्यथा कर अर्धा करावा.  अनेक महिन्यांपासून फवारणी न झाल्याने मच्छर व विषारी जंतूंचा प्रादुर्भाव वाढला आहे. महिन्यातून दोन वेळा फवारणी करण्याची मागणी केली आहे. शहरात मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांनी अनेक नागरिकांना चावा घेतला असून त्वरित  कारवाई करावी. उन्हाळ...

*तंटामुक्ती समितीच्या पुढाकाराने 2024 या वर्षात 11 वा प्रेमविवाह संपन्न**चंदनखेडा आदर्श गावात पार पडला प्रेमात गुरफटलेला प्रेमयुगलाचा प्रेमविवाह**दोघांनीही सुखाने संसार करण्याची घेतली शपथ*

*तंटामुक्ती समितीच्या पुढाकाराने 2024 या वर्षात 11 वा प्रेमविवाह संपन्न*

*चंदनखेडा आदर्श गावात पार पडला प्रेमात गुरफटलेला  प्रेमयुगलाचा प्रेमविवाह*


*दोघांनीही सुखाने संसार करण्याची घेतली शपथ*

अतुल कोल्हे भद्रावती :-
             तालुक्यातील चंदनखेडा येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीने चिमुर तालुक्यातील सावरी गावातील वैभव राजु श्रीरामे  (२1) व बोथली येथील प्रिती विठ्ठल बारेकर (20) यांनी येवून विवाह लावून देण्यात यावा अशी मागणी चंदनखेडा येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीकडे केली. त्यांनंतर अर्ज सादर करुन लग्न लावून देण्याची विनंती केली होती. त्यानंतर त. मु. समितीने ग्रामपंचायत मध्ये समीतीची सभा बोलावुन दिनांक 16 सप्टेंबर 2024 ला. महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष मनोहर शालिक हनवते  यांनी दोघांचीही कागदपत्रे तपासून, या विवाहाला समितीचे उपस्थित सर्व सदस्य मंडळी होकार देवून या विवाह ला आवर्जुन मुलांचे आई - भाऊ व इतर नातेवाईकांना तंटामुक्त समिती मार्फत बोलविण्यात आले. व ते स्वतः हजर राहून वरवधुला आशिर्वाद देऊन त्यांनांच आनंद दृघुनी करण्यात तंटामुक्त समितीला यश आलं. समोरिल जिवन सुरळीत चालत रहावं अशा शुभेच्छा मुलाच्या आई वडिल भाऊ व गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या कडुन देण्यात आल्या. व   त्यांचा विवाह 16 सप्टेंबर 2024 सोमवार ला. सायंकाळी 7:15 ला. विठ्ठल रुक्मिणी मंदिर  देवस्थान चंदनखेडा येथे  गावातील पंचासमक्ष लावून दिला.

यावेळी,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मनोहर हनवते, पोलिस पाटील समिर पठाण, सरपंच नयन जांभुळे, माजी उपसरपंच तथा समाजपरिवर्तक विठ्ठल हनवते, ईश्वर धांडे ,सिंगलदीप पेंदाम, रविंद्र मेश्राम,शाहरुख पठाण,अमर बागेसर, बशीर शेख , मारोती नन्नावरे, दुर्योधन ढोक,रवि राजनहिरे,ईशमाईल शेख.पंढरी हनवते, प्रविण भरडे,तंटामुक्त समिती सदस्या छाया घुगरे, सुशिलाबाई हनवते,,सोनाबाई खडसंग,चिंदा दोहतरे,छाया वाकडे,माधुरी मगरे,नसरिन पठाण,छाया मांदाळे, वैशाली दडमल, सुनंदा नन्नावरे, बेबी गुरुनुले,लिला ढोक, प्रशांत ढोक,गुलाब नन्नावरे, स्वप्निल गायकवाड, दिलिप कुळसंगे, लोकेश खामकर,त.म.स.सदस्य.शंकर निखाडे,सखाराम,क्षीरामे,रीना श्रीरामे, महेश, सुखदेव मित्र ,कमल बाटबरवे, कवडु जांभुळे, बालाजी धोंगडे, उद्धव नन्नावरे, रमाकांत बोढे, आशा नन्नावरे,शारदा गोहणे, आनंद राजनहिरे, ईश्वर लाखे,गोरख ककवडु पाठक,अक्षय शेंन्डे, विठ्ठल चौधरी, भाग्यश्री सोनुले, सुषमा सोनुले,पुरषोत्तम पाठक, अरविंद पाटिल, महेंद्र गुरुनुले, क्रिश्ना नन्नावरे ,रहिमतुल्ला शेख,मतिनखा पठाण,वृषभ दडमल,देवानंद दोडके,अमोल महागकार, प्रमोद हनवते, स्वप्निल चौखे, शंकर दडमल, आनंदराव दडमल, रमेश चौखे,पवन भोस्कर,कुणाल ढोक,आशिष हनवते व समस्त आदि गावातील उपस्थित होते.आई वडिल व तंटामुक्त समिती मार्फत यावेळी दोघांनीही ‌सुखदुखात  एकमेकांना साथ देण्याची  शपथ घेतली.

Comments