*बांगला देशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या विरोधात भद्रावती शहरात निषेध मोर्चा

*बांगला देशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या विरोधात भद्रावती शहरात निषेध मोर्चा*

अतुल कोल्हे भद्रावती :-
               बांगलादेशात सत्तांतरण झाल्यानंतर देशात सर्वत्र हिंसाचार उफाळला व या हिंसाचारात हिंदूंना टार्गेट करून त्यांच्यावर अन्वित अत्याचार करण्यात आला. हिंदूंवरील या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी शहरातील सकल हिंदू समाजातर्फे दि. 12 रोज सोमवारला सकाळी 11 वाजता शहरातील भद्रनाग मंदिरापासून ते तहसील कार्यालयापर्यंत एक भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला व तहसीलदारांना एक निवेदन सादर करण्यात आले. निवेदनातून बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या अत्याचाराचा निषेध करण्यात आला. मोर्चात सहभागी हिंदू बांधवांनी यावेळी बांगला देश सरकारच्या विरोधात तिव्र नारेबाजी करुन आपला निषेध व्यक्त केला. सदर मोर्चात माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, चंद्रकांत गुंडावार, एडवोकेट युवराज धानोरकर, मुकेश जीवतोडे, प्रफुल चटकी, भूपेश कायरकर, संजय गुंडावार, सुरेश परसावार, पवन हुरकट आदिंसह शहरातील हिंदू बांधव व भगीनी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

Comments