वरोरा काँग्रेस तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार* _विद्यार्थ्यांच्या यशात पालकाचाही मोठा वाटा -- खासदार धानोरकर_

*वरोरा काँग्रेस तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार* 
 _विद्यार्थ्यांच्या यशात पालकाचाही मोठा वाटा -- खासदार धानोरकर_ 

 *वरोरा :* गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशात त्यांच्या पालकाचाही मोठा वाटा असतो, पालकांनी मुलांच्या आवडीनुसार क्षेत्र निवडून त्यामध्ये करिअर करण्याची संधी द्यावी असे मत खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी व्यक्त केले. वरोरा शहर काँग्रेस तर्फे आयोजित गुणवंत विद्यार्थी व पालकांच्या सत्कार सोहळ्यात त्या बोलत होत्या. 
       माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेतील वरोरा तालुक्यातील शीर्षस्थ गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकासह शाल,पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह देऊन खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते गौरविण्यात करण्यात आले. याप्रसंगी मंचावर शहर काँग्रेस अध्यक्ष विलास टिपले, माजी नगराध्यक्ष गजानन मेश्राम, बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र चिकटे, काँग्रेस डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डाॅ. हेमंत खापणे, माजी उपनगराध्यक्ष अनिल झोटिंग,माजी नगरसेवक राजेश महाजन,ॲड.प्रदीप बुराण, महिला काँग्रेस अध्यक्षा दिपाली माटे आदी मान्यवर उपस्थित होते.
                माध्यमिक शालांत परीक्षेतील मुग्धा पेटकर, जान्हवी चव्हाण, विप्रल काळे, राहुल लोखंडे, अनुष्का वादाफळे, कृतिका अपराजित, आदिती हटवार, उच्च माध्यमिक शालांत परीक्षेतील ओम कापसे, हर्षल सोनुने, वैष्णवी निवलकर, सानिका खामनकर पियुष निरस्कर आदी शिर्षस्थ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलास टिपले व संचालन प्रा. प्रशांत खुळे यांनी केले. पालकातर्फे गजानन हटवार यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  सलीम पटेल, आसीफ रजा, सन्नी गुप्ता यांच्यासह इतर पदाधिकांनी परिश्रम घेतले.

Comments