*चंदनखेडा येथे जागतिक आदिवासी दिवस मोठया उत्साहात साजरा*अतुल कोल्हे भद्रावती :-

*चंदनखेडा येथे जागतिक आदिवासी दिवस मोठया उत्साहात साजरा*

अतुल कोल्हे भद्रावती :-

             तालुक्यातील ऐतिहासिक सातवाहन कालीन चंदनखेडा नगरी येथे दिनांक 9 ऑगस्त 2024 बसस्तानक परिसर चंदनखेडा येथे 
जागतिक आदीवासी दीन मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महात्मा गांधी तंटामुक्त समीतीचे अध्यक्ष मनोहर हनवते. हे होते यावेळी त्यांनी उपस्थित उमेदवारांना जागतिक आदीवासी दीनांच्या शुभेच्छा देऊन स्पर्धा परीक्षेत यश मिळवायचे असेल तर अभ्यासात सात्तत्य आणि जिद्द आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच प्रमुख पाहुणे म्हनुन उपस्थित माजी उपसरपंच तथा समाजपरिवर्तक विठ्ठल हनवते यांनी आपल्या मार्गदर्शनात चिकाटी, मुलाखत तंत्र परिस्थिती ची जानिव ठेऊन विद्यार्थांनी करीयर बाबत मोठे स्वप्न नक्की बघावे तसेच कठीण परीश्रम करुन अभ्यासाचे नियोजन करावे तरस यश प्राप्त करता येते असा यशाचा मंत्र दीला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस पाटील समीरखान पठाण सुद्धा उपस्तीत होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक आशिष हनवते यांनी केले.यावेळी सामाजीक कार्यकर्ता सिंगलदीप पेंदाम व  गणेश हनवते यांनी सुद्धा आदीवासी संस्क्रुती बाबत वेगवेगळे विचार मांडले संचालन देविदास चौखे यांनी केले तर आभार दीलीप कुळसंगे यांनी मानले.यावेळी  जगन्नाथ नन्नावरे,शत्रुघन रंदये, रामदास दडमल, सुरेश कुळसंगे, विकास गायकवाळ, राहुल जांभुळे, संदीप उईके, राहुल कांबळे, विशाल सोनुले, प्रशांत दडमल, आशिष पेंदाम, भारत पेंदाम, रमेश कुळसंगे, दीवाकर श्रीरामे, मंगेश गायकवाळ, प्रशांत पेंदाम, शंकर दडमल, प्रवीण भरडे,हरीलाल बटबरवे, निखिल हणवते व गावातील नागरीक उपस्थित होते.

Comments