*उपायोजना करण्यासाठी आपचे नगरपरिषदेला निवेदन*
अतुल कोल्हे भद्रावती :-
भद्रावती शहरात गेल्या काही दिवसांपासून डेंगूचा प्रकोप वाढत चालला असून शहरात डेंगूच्या रुग्णात सारखी वाढ होताना दिसत आहे. या गंभीर बाबीची लागलीच दखल घेऊन नगरपरिषद पातळीवर डास प्रतिबंधक फवारणीसह आवश्यक त्या उपाययोजना कराव्या अशी मागणी आम आदमी पार्टी भद्रावती तर्फे नगरपरिषद कार्यालयात सादर करण्यात आलेल्या एका निवेदनातून करण्यात आली आहे.
डेंगूच्या प्रादुर्भावावर आत्तापर्यंत नगरपरिषद कार्यालयाकडून आवश्यक त्या प्रभावी उपाययोजना करण्यात आलेल्या नाही. शहरातील पुरवठा होत असलेले पिण्याचे पाणी शुद्ध व निर्जंतुक राहील याची खबरदारी घ्यावी, शहरातील सर्व प्रभागांमध्ये स्वच्छता मोहीम राबवून परिसर स्वच्छ राखावा व नियमित डास प्रतिबंधक फवारणी करावी, या आजाराविषयी नागरिकांना वेळोवेळी माहिती पुरवून नागरिकात जनजागृती निर्माण करावी अशी मागणी सदर निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन सादर करताना आम आदमी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष सुरज शहा यांच्यासोबत अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment