रोटरी क्लब पदग्रहण सोहळा संपन्न :- रोटरी अध्यक्ष बंडू देऊळकर तर सचिव अभिजीत मणियार. रोट्रॅक्ट अध्यक्ष हिमांशू केशवानी तर सचिव पूर्वेश मुनोत.

रोटरी क्लब  पदग्रहण सोहळा संपन्न :-
 रोटरी अध्यक्ष बंडू देऊळकर तर सचिव अभिजीत मणियार.
 रोट्रॅक्ट अध्यक्ष हिमांशू केशवानी तर सचिव पूर्वेश मुनोत.

वरोरा :-हरीश केशवाणी.
    17 ऑगस्ट 2024 रोज शनिवारला कटारिया मंगल कार्यालय येथे रोटरी क्लब चा वर्ष 2024 -25 च्या पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या सोबतच रोटरी क्लब ने 32 व्या वर्षात पदार्पण केलेले आहे. नेतृत्व बदलाच्या उज्वल परंपरेला समोर नेत यावर्षी मावळते अध्यक्ष रोटे.डॉ.सागर वझे यांचे कडून रोटे.बंडू देऊळकर यांनी पदभार स्वीकारला तर सचिव मधुकर फुलझेले यांचे कडून रोटे. अभिजीत मणियार यांनी पदभार स्वीकारला. तसेच रोटे. दामोदर भाजपाले यांनी कोषाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला आणि या सोबतच रोट्रॅक्ट क्लबचा सुद्धा पदग्रहण सोहळा पार पडला. रोट्रॅक्ट क्लब चे मावळते अध्यक्ष रोटे.श्रेयांश फलोदिया यांचे कडून रोटे हिमांशू केशवानी यांनी पदभार स्वीकारला तर सचिव म्हणून रोटे. पूर्वेश मुनोत यांनी पदभार स्वीकारला तर कोषाध्यक्ष म्हणून मुर्तुजा बोरा यांनी पदभार स्वीकारला.
                   सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डिस्ट्रिक्ट 3030 चे रोटे.डॉ.विजय आईंचवार माजी अध्यक्ष रोटरी क्लब चंद्रपूर यांनी भूषविले, तर मुख्य अतिथी म्हणून नितेश जयस्वाल व समीर बारई उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून सांसद प्रतिभा धानोरकर ह्या उपस्थित होत्या. सुरुवातीस पूर्वाध्यक्षानी गतवर्षीचा अहवाल वाचून उत्तुंग कामाची ओळख करून दिली तर नवीन अध्यक्ष रोटे.बंडू देऊळकर यांनी भविष्यकाळात होणाऱ्या कार्याचे नियोजन सांगितले. कार्यक्रमाचे संचालन रोटे. हु्जैफा अली यांनी तर आभार प्रदर्शन अभिजीत मनियार यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. या कार्यक्रमास रोटरी क्लब, इनरव्हील क्लब,रोट्रॅक्ट क्लब सोबतच रोटरी क्लब चंद्रपूर, वणी,भद्रावती,चिमूर चे सदस्य उपस्थित होते.


Comments