अन्यथा आंदोलनाचा इशारा छोटू भाई शेख
यांचा इशारा
जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर
विषय कोळसा खान ब्लास्टिंग मोठ्या प्रमाणात हादरा बसून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण व इमारतीचे नुकसान होत असल्याबाबत
फक्त बातमी
चेतन लुतडे वरोरा
संदर्भ दैनिक वर्तमानपत्र प्रकाशित झालेले बातमी नागरिकांमध्ये पसरलेले भीतीचे वातावरण अनुषंगाने
वरोरा शहरापासून 8 किलोमीटर अंतरावर असलेले एकोना गाव येथे काही वर्षांपूर्वी कोळसाखान सुरू झाल्यापासून आतापर्यंत ब्लास्टिंग मोठ्या प्रमाणात केली जात आहे .
त्यामुळे वरोरा तालुक्यातील कोळसा खान परिसरातील 30 गाव व वरोरा शहरात नागरिकांमध्ये भूकंप चा झटका असल्याचे भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.
व तसेच शहर व गावातील घर इमारतीवर भेगा पडून त्यांचे नुकसान होत आहे. अशा जास्तीच्या ब्लास्टिंग मुळे आपल्या परिसरात मोठी हानी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने अशी घटना झाल्यास याला जबाबदार कोळसा खान व्यवस्थापन राहणार याची दखल घेण्यात यावी.
इतर ठिकाणी कोळसाखान मध्ये ब्लास्टिंग करताना एवढा हादरा बसत नाही परंतु इथे जास्त बारूद किंवा खोल ड्रिल मारून जास्तीत जास्त कोळसा काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात स्फोट केल्याने असा प्रकार होत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण व त्यांचे नुकसान होत आहे. तरी सदर मोठे ब्लास्टिंग बंद करून
कमी प्रमाणात बारूद वापरून ब्लास्टिंग करण्यात यावे जेणेकरून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होऊ नये व नागरिकांच्या इमारतीचे नुकसान होऊ नये याची काळजी घेऊन नागरिकांचा विचार करून सदर काम करण्यात यावा अन्यथा नागरिकांना घेऊन आंदोलन करण्यात येईल .
सदर विषयाचे निवेदन सामाजिक कार्यकर्ता छोटू भाऊ शेख यांनी कोळसा व्यवस्थापन प्रशासन व खासदार प्रतिभाताई धानोरकर, व जिल्हाधिकारी कार्यालयात दिले आहे.
Comments
Post a Comment