*सामाजिक कार्यकर्ते समीर देठे, सचिन भोयर, अनिकेत झिले निखिल तिखट प्रणय झाडे व समस्त गावगाऱ्यांनी दिला बेलगाव सनफ्लॅग ला ७ दिवसाचा अवधी*
मागण्या पूर्ण न झाल्यास भव्य आंदोलन करण्याचा इशारा
वरोरा
चेतन लुतडे
वरोरा तालुक्यातील सनफ्लॉग कोल माईन्स कंपनी हि गेल्या १५ ते २० वर्षापासून आटमुर्डी ग्राम पंचायत येथे कार्यरत आहे. तरी अजूनही त्यांचे कामकाज चालू असून अजून पर्यंत त्या कंपनी कडून होणाऱ्या सोई सुविधा अजूनपर्यंत गावालगत असलेल्या गावांना मिळालेल्या नाही. तसेच त्या कंपनीकडून कोळसा उत्खनन चालू असून उत्खनना करिता जी ब्लास्टिंग केल्या जात आहेत त्यामुळे सभोवतालच्या गावांना भूकंपाचे धक्के उद्भवत असून कंपनीचे कोणतेही प्रकारचे लक्ष देत नसल्याने मोठे नुकसान होत आहे.
टेमुर्डा येथून जवळच असलेल्या बेलगाव येथील सनफ्लाग कोल माईंन्स मुळे १४/०८/२०२४ ला चंद्रपूर नागपूर महामार्गावर टेमुर्डा या गावालगत खूप मोठे ६ फुट इतके मोठे भगदाळ पडले होते. त्याबाबतची माहिती वरोरा ठाणेदार साहेब यांना कळविण्यात आली होते .
महामार्गाचे अधिकारी यांना सुद्धा कळविले होते यावर सनफ्लॉग कोल माईंन्स कंपनीने यावर कोणत्याही प्रकारची उपाय योजना अजून पर्यंत करण्यात आली नाही.
गावकऱ्यांनी केलेल्या मागण्या
१) डोंगरगाव, बेलगाव व आटमुर्डी या गावातील शालेय विद्यार्थ्यांना त्वरित बससेवा सुरु करण्यात यावी.
२) नागपूर ते चंद्रपूर या राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचे प्रमाण खूप असल्यामुळे टेमुर्डा या गावात सनफ्लाग कोल माईंन्स कंपनीने रुग्ण वाहिकेची व्यवस्था करून देण्यात यावी.
३) टेमुर्डा ते डोंगरगाव रस्त्याची कोळसा वाहतुकीमुळे दुरवस्था झाली आहेत, यामुळे जाणारे- येणारे शाळकरी विद्यार्थी व नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहेत. तरी सनफ्लाग कोल माईंन्स कंपनीने यावर लवकरात लवकर उपाययोजना करण्यात यावी.
४) बेलगाव व आटमुर्डी या गावात पिण्याचे पाण्याची तीव्र टंचाई असून सुद्धा त्या गावातील लोकांना दुषित पाणी मिळत आहेत, त्यामुळे लोकांचे आरोग्याला धोका होत असल्यामुळे सनफ्लाग कोल माईंन्स कंपनीने पर्यायी व्यवस्था करावी.
अशा बऱ्याच मागण्याचे निवेदन कंपनीला सादर केले आहे.
जर मागण्या येत्या ७ दिवसात पूर्ण न झाल्यास सामाजिक कार्यकर्ते काँग्रेस समिर सुरेंद्रजी देठे व समस्त गावकरी यांनी कामबंद आंदोलन व उपोषनाचा इशारा दिला आहे.
Comments
Post a Comment