*राज्य शासनाने लाडक्या बहिणींना दिलेले वचन पूर्ण केले : ऍड. युवराज धानोरकर**भद्रावती व ऊमरीत लाभार्थी बहिणींचा सत्कार*

*राज्य शासनाने लाडक्या बहिणींना दिलेले वचन पूर्ण केले : ऍड. युवराज धानोरकर*

*भद्रावती व ऊमरीत लाभार्थी बहिणींचा सत्कार*

अतुल कोल्हे भद्रावती :-
            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करून लाभार्थी महिलांच्या खात्यात रक्षाबंधनापूर्वी योजनेचे पैसे टाकण्याचे वचन दिले होते. अखेर शासनाने आपले वचन पूर्ण करून लाभार्थी महिलांना आर्थिक आधार दिला असल्याचे प्रतिपादन शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संघटक अड. युवराज धानोरकर यांनी केले. शिवसेना शिंदे गटातर्फे भद्रावती शहरात व वरोरा तालुक्यातील उमरी गावात कार्यक्रमांचे आयोजन करून वचनपूर्ती केल्याबद्दल राज्य शासनाचे आभार मानण्यात आले. यावेळी भद्रावती व उमरी येथील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांचा  भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी भद्रावती येथील कार्यक्रमात जिल्हा संघटक अड. युवराज धानोरकर, विधानसभा संघटक नरेश काळे, शहर महिला प्रमुख तृप्ती हिरादेवे तर उमरी येथील कार्यक्रमात योगिता लांडगे, वंदना कासवटे, मनीषा लोनगाडगे, मायाताई पेंदोर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन योगिता मेश्राम यांनी तर आभार समा नैताम यांनी मानले.

Comments