मुख्यमंत्री वैद्यकीय मदत योजनेतुन ३७ हजार रुग्णांना ३०१ कोटी वितरित ... रामहरी राऊत

मुख्यमंत्री वैद्यकीय मदत योजनेतुन ३७ हजार रुग्णांना ३०१ कोटी  वितरित ... रामहरी राऊत 

वरोरा 

वरोरा : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील मुखमंत्री सहायता कक्षा मधून ३७ हजार गरजू रुग्णांना आजपर्यंत तीनशे‌ एक कोटी रुपये वैद्यकीय मदत  वितरित केली असल्याची माहिती शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष महाराष्ट्र राज्य प्रमुख रामहरी राऊत यांनी वरोरा येथे आयोजित पत्रकार परिषदेत बुधवार दि.१४ ऑगस्ट रोजी दिली.
  सदर योजनेमध्ये गोरगरीब गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष आशेचा किरण ठरला असून मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मध्ये रुग्णालय अंगीकृत करण्याची आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मधून रुग्णांनी अर्थसहाय्य मिळविण्याची प्रक्रिया संपूर्णतः निःशुल्क असल्याचे ते म्हणाले. आज पर्यंत दुर्धर आजाराने ग्रस्त रुग्णांना ३०१ कोटी रुपये अर्थसहाय्य वितरित करण्यात आले. असून मु.वै.स.क. मंत्रालय, मुंबई कार्यालयामधून तब्बल २६० कोटींपेक्षा अधिक तर ५०,००० मु.वै.स.क., नागपूर कार्यालयामधून २५ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य वाटप केले गेले . यामुळे ३७,००० पेक्षा अधिक गंभीर रुग्णांचे प्राण वाचले आहे. यामध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता मदत मिळवण्यासाठी मुंबईत मंत्रालयात जाण्याची देखील गरज नाही. ऑनलाइन अर्जावर रुग्णांना मदत मिळत आहे. यासाठी 8650567567 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून थेट आपल्या मोबाईलवर अर्ज मिळवता येत असल्याचे यावेळी ते म्हणाले.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरायम आरोग्याचा प्रकाश आणला आहे. या योजनेमुळे अनेक रुग्णांना अक्षरशः जीवनदान मिळत असल्याने ही योजना आता महाराष्ट्र राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना ठरत असल्याचे प्रतिपादन राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 
आघाडी सरकारच्या काळात बंद पडलेला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष तात्काळ सुरु केला हे विशेष.

संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मध्ये विविध आजारांचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी दिली आहे. यामध्ये अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, कर्करोगावरील शस्त्रक्रिया, केमोथेरपी, डायलिसिस, जन्मलः मूकबधिर लहान मुलांच्यासाठी अत्यावश्यक असणारी कॉकलीयर इनप्लांट शस्त्रक्रिया, सर्व प्रकारचे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, रस्ते अपघात, विद्युत अपघात, भाजलेले रुग्ण जन्मतः लहान मुलांच्या हृदयशस्त्रक्रिया आदींचा समावेश आहे. दुर्धर आजारांनी ग्रस्त रुग्णांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन मंगेश चिवटे यांचेसह रामहरी राऊत, राज्यप्रमुख, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि शिवसेनेचे चंद्रपूर जिल्हा प्रमुख नितीन मत्ते यांनी केले.


Comments