*ट्रेझरी कार्यालयात कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू**हृदयविकाराच्या झटक्याने झाला मृत्यू*

*ट्रेझरी कार्यालयात कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू*

*हृदयविकाराच्या झटक्याने झाला मृत्यू*

अतुल कोल्हे भद्रावती :-
               भद्रावती तहसील कार्यालयाच्या आवारात असलेल्या ट्रेझरी कार्यालयात रात्रोच्या वेळेस आपल्या कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना भद्रावती येथील ट्रेझरी कार्यालयात दिनांक 24 रोज शनिवारला रात्रो साडेसात वाजता घडली. 
               मधुकर कोंडू आत्राम, वय 55 वर्ष, राहणार मूळ चंद्रपूर असे मृतक पोलीस अधिकार्याचे नाव असून ते भद्रावती पोलीस स्टेशन येथे पीएसआय पदावर कार्यरत होते. घटनेची माहिती प्राप्त झाल्यानंतर भद्रावती पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. मृतक मधुकर आत्राम यांची नेहमी येथील ट्रेझरी कार्यालयात रात्रीची ड्युटी राहत होती. घटनेच्या दिवशी ते नेहमीप्रमाणे ड्युटीवर हजर झाल्यानंतर बऱ्याच वेळाने ट्रेझरी कार्यालयातील लाईट बंद दिसल्याने शेजारील शासकीय विश्रामगृहाच्या कर्मचाऱ्याने जाऊन पाहिले असता ते झोपलेल्या अवस्थेत दिसले. त्याला शंका आल्याने त्याने पोलिसांना फोन केला. पोलीस घटनास्थळी आल्यानंतर आत्राम  हे मृता अवस्थेत आढळून आले. हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त होत आहे. त्यांच्या मागे दोन मुले आहेत. त्यांच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ  व्यक्त होत आहे.

Comments