वरोरा
फक्त बातमी
सकल हिंदू समाज आयोजित भव्य दहीहंडी उत्सव कृषी उत्पन्न बाजार समिती च्या भव्य मैदानावर घेण्यात आला. गोकुळाष्टमीच्या पर्वावर वरोरा शहरात भव्य दिव्य स्वरूपात दहीहंडी महोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाआरतीने करण्यात आली. यावेळी वरोरा शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
यावेळी लहान मुलांची वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली, ज्या मध्ये शेकडो बाळगोपाळानी या स्पर्धे मध्ये सहभाग दर्शवला. उत्कृष्ट वेशभूषा करणाऱ्या बाळ गोपाळाला पारितोषिके देण्यात आले, ज्यात सर्वांना शाळेची बॅग, बुक आणि इतर साहित्य देण्यात आले आणि उत्कृष्ट वेषभुषा करणाऱ्या बाळगोपाळ विजेत्यांना सायकल चे वाटप करण्यात आले.
यावेळी वरोरा शहरातील नागरिकांनी दहीहंडीचा थरार अनुभवला. यात शीतला माता मंडळ बाबुपेठ यांनी प्रथम क्रमांक पटकाविल्यामुळे प्रथम पारितोषिक म्हणून 31000/-₹ प्रदान करण्यात आले तर दुसरे पारितोषिक हनुमान व्यायामशाळा मंडळ वरोराला 21000/-₹ मिळाले तर तिसरे पारितोषिक बजरंगदल शाखा वरोरा यांना 11000/-₹मिळाले. बजरंग दल ने मिळालेले 11000/-₹ गौरक्षनासाठी दान दिले, त्यांचा या कार्यासाठी अनेक स्तरावरून कौतुक होत आहे.
सर्व बालगोपाल, माताभगिनी आणि स्पर्धक तसेच वरोरावासी पारंपारिक आयोजनाने सुखावले आहे. दही हांडी कार्यक्रमाला प्रचंड प्रमाणात लोकांची गर्दी पाहावयास मिळाली. या कार्यक्रमात रोडमलजी गहलोत (vhp अध्यक्ष),राकेश त्रिपाठी ( विदर्भ प्रांत प्रमुख),अभिषेक मोटलग,डॉ सागर वझे,डॉ विवेक तेला,डॉ राजेंद्र ढवस,डॉ रमेश राजूरकर,किशोर टोंगे,चेतन कुटेमाटे,विलास नेरकर आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
Comments
Post a Comment