​भाजपचे 'नारी शक्ती'चे प्रेम म्हणजे केवळ निवडणुकीचा इव्हेंट :- खासदार प्रतिभा धानोरकर*

*​भाजपचे 'नारी शक्ती'चे प्रेम म्हणजे केवळ निवडणुकीचा इव्हेंट :- खासदार प्रतिभा धानोरकर* ​चंद्रपूर: "भारतीय जनता पक्ष महिला आरक्षणाचा केवळ आभासी प्रचार करून महिलांची दिशाभूल करत आहे. प्रत्यक्षात, त्यांनी या आरक्षणाला जनगणना आणि मतदारसंघांच्या पुनर्रचनेच्या जाचक अटींमध्ये अडकवून महिलांच्या हक्कांची पायमल्ली केली आहे. विशेष म्हणजे, २०२३ मध्ये संसदेत जेव्हा हे विधेयक मांडण्यात आले, तेव्हा काँग्रेसने महिलांच्या हिताचा विचार करून या विधेयकाला पूर्ण पाठिंबा दिला होता. मात्र, भाजपचा खरा हेतू महिलांना अधिकार देणे नसून हे आरक्षण अनिश्चित काळासाठी प्रलंबित ठेवणे हाच आहे," अशा परखड शब्दांत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. ​खासदार प्रतिभा धानोरकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून भाजपच्या धोरणांवर कडाडून टीका करताना स्पष्ट केले की, केंद्र सरकारने जाणीवपूर्वक जनगणनेची प्रक्रिया प्रलंबित ठेवली आहे. जोपर्यंत जनगणना होत नाही आणि मतदारसंघांची पुनर्रचना पूर्ण होत नाही, तोपर्यंत महिलांना आरक्षण मिळणार नाही, अशी अट घालणे म्हणजे देशातील स्त्रीशक्तीची...

सद्भावना चौकात गतिरोधक बसविण्याची प्रवीण काकडे यांची मागणी .

सद्भावना चौकात गतिरोधक बसविण्याची  प्रवीण काकडे यांची मागणी .

वरोरा 
चेतन लुतडे 

मागील बऱ्याच वर्षापासून वरोरा शहराच्या मध्यभागातून कोळसा वाहतूक केल्या जात आहे. यादरम्यान माढळी ते वरोरा  महत्त्वाचा वरदळीचा रस्ता असून याच रस्त्यावरून शाळेतील मुले प्रवास करीत असतात . शाळा , कोचिंग क्लास , बाजार  अशी बरीच महत्त्वाचे ठिकाण या परिसरात आहे . नागरिकांना बऱ्याच वेळा चौक ओलांडून पलीकडे यावे लागते. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या परिसरात नेहमी जड वाहतूक सुरू असते. 
या सर्वाचा पर्याय म्हणून सद्भावना चौक परिसरात गतिरोधक बसवण्याची मागणी प्रवीण काकडे यांनी केली आहे.

Comments