मनपाद्वारे गणेशोत्सव विविध परवानगीसाठी एक खिडकी प्रणाली सुरुमदतकक्षाद्वारेही करण्यात येते मदत

मनपाद्वारे गणेशोत्सव विविध परवानगीसाठी एक खिडकी प्रणाली सुरु
मदतकक्षाद्वारेही करण्यात येते मदत
येथे भेट देऊन करता येतो ऑनलाईन अर्ज  

अकूंश अवथे चंद्रपूर 

चंद्रपूर १६ ऑगस्ट - चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे गणेशोत्सवाप्रसंगी सार्वजनीक गणेश मंडळांना लागणाऱ्या विविध परवानग्या या एकाच ठिकाणाहुन मिळाव्या यासाठी एक खिडकी प्रणाली सुरु करण्यात आली असुन मनपा मुख्य इमारत येथे गणेश मंडळांसाठी मदतकक्षसुद्धा सुरु करण्यात आला आहे.
      येत्या ७ सप्टेंबरपासुन शहरात दहा दिवस गणेशोत्सव साजरा होणार आहे. गणेश मंडळांना महापालिका व इतर विभागाकडून रीतसर परवानग्या या घ्याव्या लागतात. पोलीस स्टेशन, ट्राफिक पोलीस स्टेशन,सार्वजनिक बांधकाम, अग्निशमन, महावितरण केंद्र, महानगरपालिका इत्यादी विभागाच्या परवानगी या एकच ठिकाणाहुन घेता याव्या यासाठी एक खिडकी प्रणाली चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे सुरु करण्यात आली आहे.मागील वर्षी २९० गणेश मंडळांनी एक खिडकीद्वारे गणेशोत्सवाकरीता परवानगी घेतली होती
       गणेश मंडळांना अर्ज करणे सोपे जावे याकरीता महानगरपालिका कार्यालयात एकल खिडकी प्रणाली मदतकक्ष सुद्धा स्थापन करण्यात आला आहे. https://pandal.cmcchandrapur.com या लिंकद्वारे ऑनलाईन अर्ज सादर करता येऊ शकतो. गणेशोत्सव प्रदुषणमुक्त होण्याच्या दृष्टीने पीओपी मुर्तींना थारा न देता शाडूच्या मुर्तींचाच वापर करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

Comments