एकोणा खाण परिसरात चहा पिताना वाद; लाठीहल्ल्यात ट्रकचालक जखमी

एकोणा खाण परिसरात चहा पिताना वाद; लाठीहल्ल्यात ट्रकचालक जखमी. कोळसा वाहनाचा नंबर लावण्यावरून वाद. खान प्रशासनाचे दुर्लक्ष वरोरा, ता. ११ एप्रिल : वरोरा येथील एकोणा माईन्स गेट क्रमांक दोन येथे काल सकाळी अकरा वाजता चहा पिताना झालेल्या वादातून तिघांनी ट्रकचालक सूर्यप्रतापसिंग कृष्णगोपाल सिंग (वय २५, रा. बिलघाडी, ता. गूनोर, जि. पन्ना, मध्यप्रदेश) यांच्यासह चार जणांवर लाठीने हल्ला केला. या हल्ल्यात सूर्यप्रतापसिंग यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली असून, हाताला सूज आली आहे. पोलिसांनी मनोजकुमार चंद्रवंशी, सन्नीकुमार चंद्रवंशी व सहँदरकुमार बंशी या तिघांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम  ११८(१),(२), ३५१,३५२ व जीवे मारण्याच्या धमकीच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी सूर्यप्रतापसिंग यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, आदल्या दिवशी सकाळी चार वाजता कोळसा वाहनाचा नंबर लावण्यावरून या आरोपींनी त्यांच्या साथीदार विवेक हरीसिंग याला मारहाण केली होती. ती बोलण्यासाठी सूर्यप्रतापसिंग हे आपल्या चार साथीदारांसह गेले असता, आरोपींनी कोणतीही चौकशी न करता हातातील लाकडी दांड्या...

*आरटीओ कार्यालयाच्या वतीने लाईसेंस कॅम्पचे आयोजन*

*आरटीओ कार्यालयाच्या वतीने लाईसेंस कॅम्पचे आयोजन*                   

अकूंश अवथे चंद्रपूर 

चंद्रपूर, दि. 23 : उप-प्रादेशिक परिवहन कार्यालय, चंद्रपूर तर्फे शिबीर कर्यालयाचे कामकाज सुरू करण्यात येत आहे. सदर कॅम्प मध्ये शिकाऊ अनुज्ञप्ती व पक्के अनुज्ञप्ती पूर्व नियोजित ऑनलाईन नियुक्ती नुसार देण्यात येणार आहेत. याबाबतचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.

*शिबीर ठिकाण :* 1) 26 ऑगस्ट रोजी आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन वरोरा येथे 2) 27 ऑगस्ट रोजी एन.एच. महाविद्यालय, ब्रम्हपुरी 3) 28 ऑगस्ट रोजी शासकीय विश्रामगृह, चिमूर 4) 29 ऑगस्ट रोजी शासकीय विश्रामगृह, गोंडपिंपरी  आणि 5) 30 ऑगस्ट रोजी शरद पवार महाविद्यालय, गडचांदुर

वर दिलेल्या शिबिराचे ऑनलाईन नियुक्ती  कार्यालयामार्फत खुले करण्यात येतील, याची नोंद जिल्हयातील नागरिकांनी घ्यावी, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी कळविले आहे.

००००००

Comments