फक्त बातमी
चेतन लुतडे वरोरा
वरोरा-चला बदल घडवुया अंर्तगत सुप्रसिध्द नेत्रतज्ञ डाॅ.चेतन खुटेमाटे यांच्या संकल्पनेतुन गुरुदृष्टी नेत्रालय,चंद्रपूर च्या वतीने खांबाडा येथे रविवार दिनांक ४ ऑगस्ट २०२४ ला मोफत डोळे तपासणी व चष्मे वाटप शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उदघाटन मा.प्रकाशजी शेळकी,सरपंच खांबाडा यांच्या हस्ते होत असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.डाॅ.चेतन खुटेमाटे राहणार आहे. प्रमुख अतिथी म्हणुन मा.डाॅ.एम.डब्लु.राऊत, मा.गणेश मडावी सरपंच,कोसरसार. मा.नामदेव थाटे सरपंच,बोडखा. मा.चंद्रशेखर चौधरी सरपंच,महालगाव. मा.नानाजी किन्नाके सरपंच वाठोडा. मा.जोत्सना मेश्राम सरपंच, बारव्हा. मा.प्रियंका येलके सरपंच फत्तापूर, मा.विवेक लडी, सरपंच आजनगांव.मा.अंकुश थाटे उपसरपंच वाठोडा, मा.अरविंद शेळकी,पोलीस पाटील खांबाडा. मा.सुनिल गेडाम, अध्यक्ष आदिवासी वि.सहकारी संस्था खांबाडा, मा.अर्चना विनोद झाडे,सामाजीक कार्यकर्ता खांबाळा.मा.प्रमोद वाघ, सामाजीक कार्यकर्ता हे उपस्थित राहणार असुन सदर शिबीराचा लाभ खांबाडा परीसरातील नागरीकांनी घ्यावा असे आवाहान आयोजकांनी केले आहे.
Comments
Post a Comment