गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर गजानन नगरातील बगिच्याचे लोकार्पण; नागरिकांना मिळाली स्वच्छ व सुरक्षित जागा.

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर गजानन नगरातील बगिच्याचे लोकार्पण; नागरिकांना मिळाली स्वच्छ व सुरक्षित जागा. वरोरा:22/3/26 शहरातील ओपन स्पेसमध्ये साफसफाई आणि लाइटिंगच्या सुविधांअभावी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र, नवनियुक्त नगरसेवक बंडू देऊळकर यांच्या प्रयत्नातून वार्डातील साफसफाईला सुरुवात झाली असून ओपन स्पेस विकसित करण्याचा त्यांचा मानस आहे. याचाच एक भाग म्हणून गजानन नगर येथील ओपन स्पेस मध्ये आमदार व नगरपालिकेच्या सहकार्यातून  सर्वांगीण साफसफाई करून नवीन लाइट सिस्टीम बसविण्यात आली होती.  गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नगराध्यक्षा अर्चना आशिष ठाकरे यांच्या हस्ते या बगिच्याचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थितीत नगरसेवक बंडूभाऊ देऊळकर, अनिलभाऊ झोटिंग, राहुल देवडे, अनिल पाटील सर, गौरकर सर, गोखरे सर, गठ्ठना मामा, धोटे सर, बुरीले सर, चौधरी सर, डॉ. हटवार साहेब, सौ. हटवार, संगीत नवघरे, सौ. नवघरे मॅडम यांच्यासह परिसरातील मान्यवर उपस्थित होते. नवनियुक्त नगरसेवक बंडू देऊळकर यांच्या प्रयत्नांतून वार्डातील साफसफाई व विकासाची कामे सुरू असून ओपन ...

*कापूस साठवणूक बॅग व फवारणी पंप करीता महाडीबीटी पोर्टल वर अर्ज करण्याचे आवाहन*

*कापूस साठवणूक बॅग व फवारणी पंप करीता महाडीबीटी पोर्टल वर अर्ज करण्याचे आवाहन*

अकूंश अवथे चंद्रपूर 

चंद्रपूर, दि. 2 : राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस,  सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी विकास योजनेंतर्गत कापूस पिकातील मूल्य साखळीस चालना देणे या उद्देशाने कापूस उत्पादकता वाढ व मुल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन 2022-23 ते 2024-25 या तीन वर्षात राबविण्यात येत आहे. या अंतर्गत सन 2024-25 चालू खरीप हंगाममध्ये खालील कापूस साठवणूक बॅग व बॅटरी संचालित फवारणी पंप पुरविण्यात येणार आहेत.
राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस योजना अंतर्गत कापूस साठवणूक बॅग ( बॅग प्रति हेक्टर8) वरील लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या अर्जातून ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे. चालू खरीप हंगाममध्ये बॅटरी संचालित फवारणी पंप सोयाबीन आणि बॅटरी संचालित फवारणी पंप कापूस पुरविण्यात येणार आहेत.

त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर सदर बाबींच्या टाईल्स उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. कृषी यांत्रीकीकरण या टाईल अंतर्गत शेतक-यांना अर्ज करता येतील. कापूस साठवणूक बॅग 100 टक्के अनुदानावर असल्याने जास्तीत जास्त शेतकरी बांधवानी mahadbt.maharashtra.gov.in‍farmerlogin
mahadbt.maharashtra.gov.in‍farmerlogin या  वेबसाईड वर जाऊन ऑनलाईन अर्ज करावेत व योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.            

००००००

Comments