खाकीची मान उंचावली! पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा भव्य सत्कार: पोलिसांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला

खाकीची मान उंचावली! पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा भव्य सत्कार  पोलिसांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला बातमी: वरोरा 16/4/26 वरोरा : १४ एप्रिल रोजी आंबेडकर जयंतीच्या उत्सवी वातावरणात आंबेडकर चौक, वरोरा येथे अचानक आग लागल्याची घटना घडली. या गंभीर प्रसंगी सहाय्यक  पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांनी विलक्षण तत्परता आणि धाडस दाखवत स्वतः पुढाकार घेत, आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. त्यांच्या या वेगवान व धैर्यशील कृतीमुळे मोठा अनर्थ टळला. या पराक्रमाची दखल घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, वरोरा तर्फे पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना पुष्पगुच्छ, शाल व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. शरद भस्मे यांच्या कार्यामुळे ‘खाकी’ वर्दीवरील विश्वास अधिक दृढ झाला असून, त्यांच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे. संकटसमयी दाखवलेली त्यांची जबाबदारी, तत्परता आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी ही इतरांसाठी प्रेरणादायी ठरते. “संकटाच्या वेळी धावून येणारी खाकीच खरी जनतेची ताकद आहे,” याचे उत्तम उदाहरण म्हणजे शरद भस्मे य...

*पी.एम. किसान पोर्टलवर 31 ऑगस्ट पर्यंत मोबाईल क्रमांक अपडेट करावा* चुकीचा मोबाईल क्रमांक असलेल्या शेतक-यांची यादी कृषी सहायकाकडे उपलब्ध*

*पी.एम. किसान पोर्टलवर 31 ऑगस्ट पर्यंत मोबाईल क्रमांक अपडेट करावा*           

*Ø चुकीचा मोबाईल क्रमांक असलेल्या शेतक-यांची यादी कृषी सहायकाकडे उपलब्ध*

चंद्रपूर, दि.23 : देशातील अल्पभुधारक शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता केंद्र शासनाने ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना’ 1 डिसेंबर 2018 पासून सुरू केली आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये आर्थिक मदत देण्यात येत आहे. तसेच केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अतिरीक्त लाभ म्हणून  राज्य शासनाने ‘नमो शेतकरी महा सन्मान निधी’ ही योजना सुरू केली असून पी.एम. किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर महाराष्ट्र शासनातर्फे वर्षाला अतिरीक्त 6 हजार रुपये जमा करण्यात येत आहेत. त्यामूळे महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात चार महिन्याच्या अंतराने केंद्र व राज्य सरकारचे मिळून 4 हजार असे वर्षाला एकूण 12 हजार रुपये जमा होत आहे.

पी. एम. किसान सन्मान निधी योजनेची रक्कम मिळवण्यासाठी शेतकऱ्यांची पी. एम. किसान पोर्टलवर ई-केवायसी व लँड सिडींग असणे, तसेच बॅंक खात्याला आधार जोडणी पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. सदर बाबी परीपूर्ण नसल्यास शेतकऱ्यांना पी.एम. किसान सन्मान निधी व नमो शेतकरी महा सन्मान निधी या दोन्ही योजनांचा लाभ मिळणार नाही.
पी. एम. किसान पोर्टलवर नोंदणी करतेवेळी जिल्ह्यातील 1624 लाभार्थी शेतकऱ्यांचा चुकीचा किंवा एकच मोबाईल क्रमांक अनेक शेतकऱ्यांच्या नावे असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामूळे अशा शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना संबंधित कोणतेही एस.एम.एस. प्राप्त होत नाही. अशा शेतकऱ्यांची यादी संबंधित गावाचे कृषि सहायक यांच्याकडे उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सदर चुकीचा/ डुप्लीकेट मोबाईल क्रमांकाच्या दुरूस्तीसाठी केंद्र शासनातर्फे पी. एम. किसान पोर्टलवर Farmer Corner मध्ये Update Mobile Number ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सदर सुविधा दिनांक 31 ऑगस्ट, 2024 पर्यंत उपलब्ध असल्याने सर्व संबंधित शेतकऱ्यांनी या सुविधेचा उपयोग करून 31 ऑगस्ट 2024 पुर्वी त्यांचे पी. एम. किसान खात्यातील नोंदणीकृत मोबाईल क्रमांक अद्यावत करून घेण्याचे आवाहन कृषी विभाग तथा जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
००००००

Comments