राज्य लोकसेवा हक्क आयुक्त अभय यावलकर यांचा 22 ऑगस्ट रोजी वरोरा तालुक्याला दौरा*

*राज्य लोकसेवा हक्क आयुक्त अभय यावलकर यांचा 22 ऑगस्ट रोजी वरोरा तालुक्याला दौरा*

अकूंश अवथे चंद्रपूर 

चंद्रपूर, दि. 20 : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत करावयाच्या कामकाजाबाबत विविध  कार्यालयीन तपासणी करिता तसेच तसेच चर्चे करिता राज्य लोकसेवा हक्क आयुक्त अभय यावलकर हे 22 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 12 वाजता उपविभागीय  कार्यालय वरोरा  येथे भेट देणार आहेत. तसेच तिथे तालुका स्तरीय विभाग प्रमुख यांची आढावा बैठक घेण्यात येणार आहे.

यावेळी ते वरोरा तहसील येथील विविध शासकीय  विभागांची कार्यालयीन तपासणी सुद्धा करणार आहे सदर कालावधीत विविध  सेवेसंबंधात सूचना किंवा नागरिकांना आपले म्हणणे मांडावयाचे असल्यास अभ्यागताना आयुक्तांना भेटता येईल, अशी माहिती  वरोराच्या उपविभागीय अधिकारी शिवनंदा लंगडापुरे यांनी दिली आहे.

Comments