पत्नीवर लोखंडी रॉडने हल्ला; आयसीयूत उपचारानंतर कळले खरे कारण. वरोरा पोलिसात तक्रार दाखल. वरोरा, दि. २५ मार्च – वरोरा येथील जिजामाता वॉर्डात राहणाऱ्या विवाहितेला तिच्या नवऱ्याने लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्नीची प्रकृती बिघडल्याचे सांगून तिच्या पालकांना हॉस्पिटलमध्ये बोलाविण्यात आले होते; मात्र नंतर उघडकीस आले खरे कारन . याप्रकरणी पीडितेच्या आईने वरोरा पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, एका युवतीचा विवाह मे २०२५ मध्ये गणेश ठेंगणे (वय २५) याच्याशी प्रेमाने झाला होता. लग्नानंतर दोन महिन्यांपासूनच गणेश हा दारूच्या नशेत पत्नीला मारहाण करू लागला होता. त्यावेळी वरोरा पोलिसात तक्रार दिल्यानंतर महिला उपदेशन केंद्रात समजूत घालण्यात आली होती. मात्र, तरीही आरोपीचा त्रास सुरूच राहिला. दि. १२ मार्च २०२६ रोजी दुपारी एक ते दोनच्या दरम्यान गणेश याने पत्नीच्या वडिलांना फोन करून तिची प्रकृती बिघडल्याचे सांगत एका हॉस्पिटल, चंद्रपूर येथे बोलावले. तेथे गेल्यावर पालकांना मुलगी आयसीयूत बेशुद्ध अवस्थेत आढळली होती. यान...
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment