वरोरा: आज वरोरा येथील रत्नमाला चौकात युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. कुणालजी राऊत यांच्या आगमनानंतर त्यांचे उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. या विशेष प्रसंगी काँग्रेस, युवक काँग्रेसचे सदस्य तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा बैठकीचे सत्र कुणालजी राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत चंद्रपूर जिल्हात पार पडत असून याच निमित्याने त्यांचं आगमन वरोरा या ठिकाणी झाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कुणालजी राऊत यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष कुणालजी राऊत यांनीं युवकांच्या समस्या आणि त्यावर उपाय यासंबंधी चर्चा केली. उपस्थितांनी त्यांच्या नेतृत्वाखालील युवक काँग्रेसच्या कार्याचा गौरव केला आणि भविष्यातील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी अमर गोंडाने- सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी (अनु.जा.वी), युवक काँग्रेस प्रदेश सचिव चेतनभाऊ शर्मा, मा. सोनारकर गुरुजी, युवक काँग्रेस वरोरा तालुका अध्यक्ष राहुलभाऊ नन्नावरे, युवक काँग्रेस वरोरा शहर नेते राहुलभाऊ आत्राम, अभी चौधरी, जितेश चौधरी, हाशिम अली, राजीक पठाण, मयूर उमाटे, शुभम गवई, योगेश खोब्रागडे, प्रशांत जुनघरे तसेच इतर सहकारी उपस्थित होते.
या आगमनाने युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा संचारली असून त्यांनी आपली भूमिका अधिक जोमाने पार पाडण्याचे आश्वासन दिले.
Comments
Post a Comment