*शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे यांच्या वतीने कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या उपचारार्थ आर्थिक मदत व रुग्णांना फळवाटप*
भद्रावती :
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे यांच्या पुढाकारात आज दि. २७ जुलै रोज शनिवारपासून एक आठवडा विविध सामाजिक उपक्रम राबवून जनसेवा सप्ताह साजरा करण्यात येत आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे यांच्याकडे शेंबळ येथील कॅन्सरग्रस्त रुग्ण आदित्य सुनिल उमरे यांच्या वैद्यकीय उपचारार्थ आदित्यची आई गिरजा, वडील सुनिल व बहीण शितल उमरे यांनी नागपूरच्या एम्स हॅास्पीटल मधून आदित्यच्या उपचारार्थ आर्थिक मदतीची मागणी केली. सदर घटनेचे गांभिर्य लक्षात घेवून जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे यांनी आज दि. २७ जुलै रोजी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवस कार्यक्रमातुन भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती अश्लेषा मंगेश भोयर आणि नंदोरीचे सरपंच मंगेश भोयर यांना नागपूर च्या एम्स हॅास्पीटलमध्ये तात्काळ रवाना करून उमरे कुटूंबियाला तीस हजार रुपयांची आर्थिक मदत केली.
तसेच स्थानिक ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख नरेंद्र पढाल, शहर प्रमुख घनशाम आस्वले, जिल्हा युवा सेना प्रमुख रोहण खुटेमाटे, युवा सेना तालुकाप्रमुख राहुल मालेकर, युवासेना शहर प्रमुख मनोज पापडे, युवा सेना सरचिटणीस येशू आर्गी, युवा सेना तालुका समन्वयक सतीश आत्राम, शिवसेना उपशहर प्रमुख विश्वास कोंगरे, उत्तम मुजुमदार, विजय पारधे, संतोष माडेकर, शिवसैनिक शंकर स्वान व निलेश चोपकर प्रामुख्याने उपस्थित होते.
*गुणवंत युवकाचा सत्कार*
*यापूर्वी भद्रावती व वरोरा तालुक्यात शिवसेना (उ.बा.ठा.) आणि युवा सेना यांच्या संयुक्त विद्यमाने तलाठी व वनरक्षक भर्ती परीक्षेची पुर्वतयारी करण्याच्या द्दष्टीने युवक-युवतींसाठी टेस्ट सिरीज राबविण्यात आली. या टेस्ट सिरीजमध्ये सहभागी होऊन नागपूर जिल्हयात भिवापूर येथे तलाठी पदी नियुक्ती झाल्याबद्दल स्थानिक श्रीकृष्ण नगर येथील मुळ रहीवासी असलेले अंकित हनुमान आस्वले यांचा शाल, श्रीफळ व स्मृर्ती चिन्ह देवून सत्कार करण्यात आला.
*शिवसेना (उ.बा.ठा.) चा गरजूंना मदतीचा हात देण्याचा संकल्प : नाव नोंदणीचा शुभारंभ*
*सध्या सर्वत्र सुरु असलेल्या पाऊसांमुळे पिडीत जनतेला आधार व सहकार्य करण्यात येईल. दिव्यांग बांधवांना नि : शुल्क सायकल वाटप करण्यात येईल. गरीब, गरजू, निराधार, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी आणि महिलांना मदत करण्यात येईल. डोळयांचा आजार असलेल्या ज्या रुग्णांना डॉक्टरांनी डोळयांचे ऑपरेशन करण्याची शिफारस केली आहे. अश्या गरजु रुग्णांच्या डोळयांचे ऑपरेशन सावंगी ( मेघे ) वर्धा येथील दवाखाण्यात निःशुल्क करण्यात येईल. आज दि. २७ जुलै रोजी गरजूंना मदतीचा हात देण्याचा संकल्प या उपक्रमानुसार नाव नोंदणीचा शुभारंभ करण्यात आला. अशा सर्व गरजू बंधू-भगिनींनी शिवसेना (उ.बा.ठा.) पक्ष कार्यालय भद्रावतीच्या शिवनेरी येथे आपआपल्या नावांची नोंदणी करावी, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे यांनी केले आहे.
Comments
Post a Comment