वरोरा इनरव्हील क्लबच्या अध्यक्षपदी दिपाली माटे व सचिवपदी माया बजाज यांची नियुक्ती गरजू विद्यार्थ्याला ट्युशन फी भेट देऊन इनरव्हीक्लबचा समारंभ साजरा करण्यात आला.
वरोरा इनरव्हील क्लबच्या अध्यक्षपदी दिपाली माटे व सचिवपदी माया बजाज यांची नियुक्ती
गरजू विद्यार्थ्याला ट्युशन फी भेट देऊन इनरव्हीक्लबचा समारंभ साजरा करण्यात आला.
फक्त बातमी
चेतन लुतडे वरोरा
वरोरा येथील इनरव्हील क्लब च्या वतीने पदग्रहण समारंभ शनिवार शहरातील कामगार चौकातील हॉटेलच्या सभागृहात इनरव्हील क्लबचा पदग्रहण समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मंचावर उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांचे तसेच गतवर्षातील पदाधिकारी यांचे भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले.
सर्वप्रथम मागील प्रेसिडेंट सौ. वैशाली चहारे यांनी आपला कार्यकाल थोडक्यात सर्व सदस्या समोर मांडला. सोबतच त्यांना मिळालेली पुरस्कार यांचाही त्यांनी उल्लेख केला. वर्षभरात तुमच्या सदस्यांनी उत्कृष्ट कार्य केलेत त्या सर्वांना सन्मानित करण्यात आले.
वैशालीने आपला पदभार नवनिर्वाचित अध्यक्ष सौ. दिपाली माटे यांना सोपवला .
पदभार सांभाळल्यानंतर सौ. दिपाली माटे यांनी आपली सदस्य जाहीर केले. ज्यात उपाध्यक्ष सौ. स्नेहा जवदंड, सेक्रेटरी माया बजाज, ट्रेझरर सौ.सुचिता पद्मावार, आय .एस.ओ सौ. वंदना बोढे, सीसी सौ. किरण जाखोटिया
यांनीही आपला पदभार सांभाळला. या पदग्रहण समारंभाच्या वेळेस गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच वरोरा शहरातील एका विद्यार्थ्याला त्याची ट्युशन फी देण्यात आली. याच कार्यक्रमात 'फ्रेंडशिप डे ' पण साजरा करण्यात आला. इनरव्हील चे नवे अध्यक्ष दिपाली माटे यांनी आपले मनोगत व्यक्त करत महिलांसाठी समाज उपयोगी योजना वरोरा शहरात तसेच गाव खेड्यामध्ये राबवण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे संचालन जैनब सिद्धीकोट यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ माया बजाज यांनी केले. या कार्यक्रमासाठी रोटरी प्रेसिडेंट बंडू देऊडकर , सेक्रेटरी अभिजीत मनियार, रोटरॅक्ट प्रेसिडेंट हिमांशू केशराची, सेक्रेटरी पुरवेश मुनोत तसेच सर्व क्लब मेंबर या सर्वांच्या उपस्थितीत हा पदग्रहण सोहळा सहभोजनाचा आनंद घेत पार पडला.
*राजश्री शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलावंतांचे अर्ज सादर करण्याचे आवाहन*
चंद्रपूर, दि. 27 : राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलावंत यांचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने मागविण्यात येत आहे. तरी सर्व पात्र लाभार्थ्यांनी https://mahakalasanman.org/pgeApplication Form ForUser.aspx या संकेत स्थळावर जावून अर्ज करावे व ऑनलाईन केलेले अर्ज आणि संबंधित दस्ताऐवज अर्जधारकांनी आपल्या तालुक्यातील पंचायत समितीमध्ये सादर करावेत, असे आवाहन जिल्हा समाजकल्याण अधिकारी तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रापं.) जिल्हा परिषद यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment