गरजू विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी नेहमी पुढाकार घेणार *किशोर डुकरे यांचे आश्वासन *गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वितरण
*किशोर डुकरे यांचे आश्वासन *गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वितरण
वरोरा : ग्रामीण भागातील मुले-मुली विशेष करून शेतकरी किंवा शेतमजुरांची असतात. त्यातील अनेक मुले,मुली हुशार असतानाही आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने आवश्यक शिक्षणापासून वंचित राहतात. अशा हुशार व गरजू मुला-मुलींच्या शैक्षणिक मदतीसाठी आपण नेहमी पुढाकार घेऊ असे आश्वासन सामाजिक कार्यकर्ते किशोर डुकरे यांनी सुमठाणा(पू) येथे दिले.
माजी खासदार दिवंगत बाळू धानोरकर यांच्या जयंती दिनानिमित्त खासदार प्रतिभा धानोरकर आणी श्री राजेंद्र चिकटे कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती तसेच संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली श्री बाळू भाऊ धानोरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज शुक्रवार दिनांक ५ जुलै रोजी सर्वोदय विद्यालय सूमठाणा(पू) येथील गरजू विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले, तेव्हा ते बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी वरोरा शहर किंवा परिसरात मनोरुग्णांसाठी २५ खाटांचे आश्रम सुरू करणार असल्याचा मानस व्यक्त केला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डॉ. सुनील गौरकार तर प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते किशोर डुकरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल पाटील यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून किशोर डुकरे यांच्या कार्याचा परिचय करून दिला. सुनील गौरकार यांनी अध्यक्षीय भाषणातून किशोर डुकरे यांच्या कार्याचे कौतुक केले. तसेच यापुढेही त्यांची मदत शाळेला होत राहील अशी आशा व्यक्त केली. मनोज वनकर यांनी देखील आपल्या मनोगतातून किशोर डुकरे यांच्या कार्याची प्रशंसा केली. सदर कार्यक्रमात वरोरा तालुक्यातील आसाळा, येवती, वाघणख आणि कोसरसार येथे शिक्षण घेणाऱ्या गरजू शंभरावर विद्यार्थ्यांना सुद्धा गणवेश आणि शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन सुरेश गोखरे यांनी केले. तर संदीप खिरटकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला ईश्वर बोढाले, अमोल दातारकर ,मधुकर काळे , संजय पारोधे यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाला अशोक जोगी, लक्ष्मण हरणे, हिरबा भगत यांचे सहकार्य लाभले.
--------****--------
Comments
Post a Comment