*आम आदमी पार्टी चे नगर परिषद वरोरा समोर नागरिकांच्या समस्या घेऊन ठिय्या आंदोलन.*

*आम आदमी पार्टी चे नगर परिषद वरोरा समोर नागरिकांच्या समस्या घेऊन ठिय्या आंदोलन.*

*सामान्य लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या अधिकाऱ्यांना व ठेकेदारांना निलंबित करा :- जिल्हा उपाध्यक्ष सुरज शहा.*

बोगस नालीचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करा.

वरोरा 
चेतन लुतडे 8/7/24

दिनांक 08/07/2024 रोजी आम आदमी पार्टी च्या वतीने नगर परिषद वरोरा विरोधात ठिय्या आंदोलन करण्यात आले. नुकताच शहरात मुसळधार पावसाने हजेरी दिली. राजीव गांधी वॉर्ड वरोरा येथे 2 महिन्या अगोदर नालीचे बांधकाम करून संरक्षण भिंत उभी करण्यात आले होते. त्याच नालीचे बांधकाम इतके बोगस असल्याने पहिल्याच पावसात नालीचे पूर्ण बांधकाम व संरक्षण भिंत वाहून गेले व त्यामुळे सर्व नालीचे पाणी  राजीव गांधी वार्ड मधील घरात घुसल्याने जनसामान्य नागरिकांचे हाल झाले. लोकांच्या घरात तीन फूट  पाणी साचल्याने  सरपटणाऱ्या प्राण्यामुळे जीवाला धोका निर्माण झाला होता. पाण्यामुळे लोकांचे धान्य ओले होऊन खराब होण्याच्या स्थितीत होते. 
******************************************
जाहिरात
भाजपा युवा नेता करण देवताळे यांना शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांच्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
******************************************

संबंधित प्रकरणाची माहिती आम आदमी पार्टी वरोरा चे ता.अ.गौरव मेले ,  जि. उपाध्यक्ष सूरज शहा व  सुमित हस्तक यांना दिली. त्यांनी जागेवर येऊन पाहणी केली व नगर परिषद वरोरा चे मुख्यधिकारी साहेब यांचाशी दूरध्वनी द्वारे संपर्क केले असता प्रशासनाने दाखल घेत इंजिनियर व संबंधित अधिकाऱ्यांना  जागेवर पाठवण्याचे व मदतीचे आश्वासन देण्यात आले. 
 परंतु त्या जागेवर इंजिनियर साहेब पोहचू शकले नाही व नागरिकांना मुख्यधीकारी यांनी आश्वासन देऊन सुद्धा मदत भेटू शकली नाही. त्यांमुळे सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना घेऊन आम आदमी पार्टी चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष तथा वरोरा - भद्रावती विधानसभा अध्यक्ष सुरज शहा यांच्या नेतृत्वात, युवा जिल्हा उपाध्यक्ष सुमित हस्तक यांच्या मार्गदर्शनात व तालुका अध्यक्ष गौरव मेले यांच्या प्रमुख उपस्थितीत जनसामान्य नागरिकांना घेऊन नगर परिषद वरोरा समोर ठिय्या आंदोलन करून मुख्याधिकारी साहेब यांना निवेदनातून इशारा देण्यात आला.
येत्या सात दिवसाच्या आत नालीचे बांधकाम पूर्ण करा व येत्या पंधरा दिवसाच्या आत नालीचे बांधकाम बोगस करणाऱ्या ठेकेदारावर व इंजिनियर वर कार्यवाही करा अन्यथा येत्या काळात अजून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आम आदमी पार्टी तर्फे देण्यात आला. यावेळी आम आदमी पार्टी चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष तथा वरोरा - भद्रावती विधानसभा प्रमुख सुरज शहा, युवा जिल्हा उपाध्यक्ष सुमित हस्तक, वरोरा तालुका अध्यक्ष गौरव मेले व असंख्य महिला कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.


Comments