वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक

वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक दुपारी कापूस टाकताना दुर्घटना; अर्ध्या तासात १० हजार क्विंटल माल राखेत रवीकमल कोटेक्स जिनिंग  येथील घटना  वरोरा .13/4/26: वरोरा तालुक्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डा रोडवरील रवीकमल कोटेक्स कापूस जिनिंग प्रकल्पात सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. जिनिंग मधील कापूस डोजरद्वारे टाकत असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दुर्घटनेत तब्बल ८ ते १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून, सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार कार्यरत होते. गोदामात कापसाच्या गाठी व बाहेर ट्रक भरून कापसाच्या गाठी लोड करून होत्या. इथपर्यंत अग्निशामक दलाने आग पोहोचू दिली नाही.  आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच परिसरातील हजारो क्विंटल कापूस राखरांगोळा झाला. या आगीत कापसासोबतच डोजर ट्रॅक्टर आणि इतर साहित्यही भस्मसात झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या ...

वरोरा उडान पुलावर कारचा टायर फुटल्याने दुचाकी स्वार गंभीर जखमी.

वरोरा उडान पुलावर कारचा टायर फुटल्याने दुचाकी स्वार गंभीर जखमी.

वरोरा 
चेतन लुतडे 

वरोरा येथील उडान पुलावर कार व दुचाकीचा अपघात झाल्याने पाच जखमी झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये दुचाकीने जाणाऱ्या देवगडे परिवारातील
अभिजीत देवगडे वय 7 वर्ष, अजय देवगडे वय 10 वर्ष, विजय देवगडे वय 40 वर्ष, मुक्तेश्वर देवगडे वय 40 वर्ष, यांना गंभीर दुःखद झाली असून उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे उपचारार्थ दाखल केल्यानंतर जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे हलवण्यात आले आहे. यामध्ये लहान मुलाची प्रकृती गंभीर असल्याची कळते. 


अपघात रात्री 9.30 वाजताच्या सुमारास वरोरा उडान पूल वरील बस स्थानकाच्या पुढील भागात झाला. यामध्ये कारचा उजवा टायर फुटल्याने कारचालकाचे संतुलन गेल्याने पुढे जात असलेल्या दुचाकीला धक्का दिल्याने त्यावरील लहान मुलगा पुलावरून खाली पडला. त्यामुळे त्यांची प्रकृती  चिंताजनक आहे. खैरगाव येथील काही मित्रांनी मदत करून लगेच जिल्हा रुग्णालय गाठले आहे. सदर प्रकरणातील दुचाकी आणि कार पोलिसांनी ताब्यात घेतली असून पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहे.
...........


Comments