**मानधन थकल्याने आशा सेविकांचा संताप; चंद्रपूर जिल्हा परिषदेवर धडक, २१ एप्रिलपासून मुंबईत बेमुदत संपाचा इशारा!**

**मानधन थकल्याने आशा सेविकांचा संताप; चंद्रपूर जिल्हा परिषदेवर धडक, २१ एप्रिलपासून मुंबईत बेमुदत संपाचा इशारा!** *चंद्रपूर:*अंकूश अवथे   "सहा महिन्यांचे मानधन थकले आहे, आम्ही आमचे कुटुंब पोसायचे कसे?" असा संतप्त सवाल करत आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गट प्रवर्तक संघटनेने गुरुवारी जिल्हा परिषद कार्यालयावर जोरदार धडक दिली. राज्य उपाध्यक्ष कॉ. विनोद झोडगे पाटील यांच्या नेतृत्वात हजारो महिला कर्मचाऱ्यांनी सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी करत जिल्हा प्रशासनाला धारेवर धरले. ऑक्टोबर २०२५ पासून केंद्र सरकारकडून मिळणारे मानधन प्रलंबित असल्याने आशा सेविकांवर उपासमारीची वेळ आली आहे. निवेदनात प्रामुख्याने आशा व गट प्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देणे, सेवानिवृत्तीचे वय ६० वरून ६५ करणे, आणि ७० वर्षांवरील लाभार्थी नोंदणी यांसारख्या ऑनलाइन कामांसाठी अत्याधुनिक अँड्रॉइड मोबाईल व डेटा पॅक पुरवणे या मागण्या करण्यात आल्या आहेत. जोपर्यंत सुविधा मिळत नाही, तोपर्यंत 'मात्रा ऍप'वरील कामाची सक्ती करू नये, अशी भूमिका संघटनेने घेतली आहे. मुख्य कार्य...

शिवसेनेच्या आक्रमक पवित्र्यामुळे अरबिंदू कोळसा खाण कंपनीला मूर्ती जागेवर आणावी लागली.ग्रामदेवतेची मूर्ती हटवल्याने गावकऱ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या.

शिवसेनेच्या आक्रमक पवित्र्यामुळे अरबिंदू कोळसा खाण कंपनीला मूर्ती जागेवर आणावी लागली.

ग्रामदेवतेची मूर्ती हटवल्याने गावकऱ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या. 

शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांच्या मध्यस्थीने मूर्ती जागेवर वापस आणली. 

वरोरा 
चेतन लुतडे 

 भद्रावती तालुक्यातील बेलोरा गावाशेजारी अरबिंदू कोळसाखानीमध्ये खान प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. अरबिंदू कोळसाखान प्रशासनाने बेलोरा ग्रामस्थांना कुठल्याही सूचना न देता गावाचे आराध्य दैवत असलेली मूर्ती परस्पर रित्या दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात आल्याने गावकऱ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या. या आधी सुद्धा या कंपनीने गावकऱ्यांच्या बऱ्याच मागण्या धूडकाऊन लावत मूजोरीने काम सुरू केले आहे.
 हा परिसर वनविभागातील व्याघ्र संरक्षणासाठी काही भाग संरक्षित असून नदीतून वाघाचे येणे जाणे सुरू असते. त्याचे तंतोतंत पालन अजून पर्यंत करण्यात आले नाही.
कोळसा उत्खनन नियमानुसार गावाचे पुनर्वसन ,गावाचा विकास , प्रदूषणाचे निकष, रोजगारांचा प्रश्न, शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला असे बरेचसे महत्त्वाचे प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहेत. 
 
त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्याकडे खान व्यवस्थापन व बेलोरा ग्रामवासीय यांच्यामध्ये चर्चा घडविण्यात आली होती. या चर्चेदरम्यान बेलोरा या गावासंदर्भात कुठलेही कार्य करायचे असेल तर त्याची रीतसर माहिती बेलोरा ग्रामपंचायतींना द्यावी व त्यांचा होकार घेऊनच पुढील कार्यवाही करावी असे ठरले होते .
परंतु अरबिंदू कोलमाइंस व्यवस्थापनाने ग्रामस्थांना कुठली सूचना न देता त्यांचे ग्रामदैवत हलवून परस्पर दुसऱ्या ठिकाणी ठेवल्याने गावकऱ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या. यासंदर्भात ग्रामस्थांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांना सूचना केल्या व त्या सूचनेवरून समस्त ग्रामवासियांसह वरोरा विधानसभेचे समन्वयक विलास पचाके उपतालुकाप्रमुख सिंगलदीप पेंदाम व बेलोरा येथील सरपंच उपसरपंच यांच्या प्रमुख उपस्थितीत अरबिंदू खान व्यवस्थापनाच्या विरोधात आंदोलन उभारण्यात आले. शिवसेना  जिल्हाप्रमुख नितीन मते यांचा आक्रमक पवित्रा पाहून अरबिंदू खान प्रशासनाने अखेर गुडघे टेकले. गावाचे आराध्य दैवत असलेली  ग्रामदेवतेची मूर्ती पुन्हा त्याच जुन्या जागेवरती ठेवण्यास भाग पाडल्याने गावकरी शांत झाले. 

याप्रसंगी  भद्रावती तहसीलदार व भद्रावती पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक इंगळे व जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांनी गावकरी व कंपनीच्या माध्यमातून समेट घडवून वाद मिटवण्यात आला. 
याप्रसंगी बंराज गावातील प्रशांत मते ,बंडू आगलावे ,प्रशांत मते ,प्रवीण मते, विकास पंडिले ,सोमा देहारकर ,अतुल मते ,सरलाताई ठोंबरे व अनेक महिला भगिनी व गावकरी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

जाहिरात
         भाजपाचे युवा नेते किशोर भाऊ टोंगे.

Comments