अकूंश अवथे चंद्रपूर
, चंद्रपूर- गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरच्या चिचपल्ली गावातील घटना, दोन्ही बसमधील सुमारे 16 प्रवासी किरकोळ जखमी, जखमींमध्ये दोन्ही एसटी बसेसच्या चालकांचा समावेश, या अपघातामुळे या महामार्गावरची वाहतूक काही काळ विस्कळीत, पोलीस व स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने जखमींना चिचपल्ली प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविले, सध्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
चंद्रपूर जिल्ह्यातील चिचपल्ली गावात दोन एसटी बसेस समोरासमोर धडकल्या. ही घटना चंद्रपूर- गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरच्या चिचपल्ली गावात घडली. दोन्ही बसमधील सुमारे 16 प्रवासी अपघातात किरकोळ जखमी झालेत. जखमींमध्ये दोन्ही एसटी बसेसच्या चालकांचा समावेश आहे. या अपघातामुळे या महामार्गावरची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. पोलीस व स्थानिक ग्रामस्थांनी जखमींना तातडीने चिचपल्ली प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविले. सध्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.
Comments
Post a Comment