स्थानिक प्रश्नावरून कर्नाटका एम्टाच्या आंदोलनात अधिकाऱ्यास मारहाण.

स्थानिक प्रश्नावरून कर्नाटका एम्टाच्या आंदोलनात अधिकाऱ्यास मारहाण. 

चंद्रपूर 
अंकुश अथव

 चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरालगतच्या कर्नाटक -एमटा कोळसा खाण व्यवस्थापकाला नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या उपस्थितीत आंदोलनादरम्यान मारहाण, 

स्थानिकांच्या 16 मागण्यांसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी सुरू केले होते आंदोलन, आंदोलनस्थळी आज खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिली भेट, 

 यादरम्यान आंदोलक व व्यवस्थापक यांच्यात मागण्याच्या पुर्ततेवरून झाली शाब्दिक चकमक, मारहाणीनंतर पोलिसांनी जमावाला पांगविले,  काँग्रेस कार्यकर्त्यांनी मागण्या पूर्ण होईपर्यंत खाणीचे काम पाडले बंद

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरालगतच्या कर्नाटक -एमटा कोळसा खाण व्यवस्थापकाला नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या उपस्थितीत आंदोलनादरम्यान मारहाण करण्यात आली. खाण प्रकल्पग्रस्त स्थानिकांच्या 16 मागण्यांसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी खाण कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले होते. दरम्यान आंदोलनस्थळी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी भेट दिली.  चर्चेरम्यान आंदोलक व व्यवस्थापक यांच्यात मागण्याच्या पुर्ततेवरून आधी शाब्दिक चकमक व नंतर व्यवस्थापक शिवप्रसाद यांना मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर पोलिसांनी जमावाला पांगविले.  काँग्रेस कार्यकर्त्यांनी मागण्या पूर्ण होईपर्यंत खाणीचे काम बंद पाडले आहे.