मुख्यमंत्री येणार म्हणून डांबरीकरणाला सुरुवात; भद्रावतीतील रस्त्याच्या कामावर गावकऱ्यांचा निशाणा

मुख्यमंत्री येणार म्हणून डांबरीकरणाला सुरुवात; भद्रावतीतील रस्त्याच्या कामावर गावकऱ्यांचा निशाणा Instagram link ,view for reel चंद्रपूर / भद्रावती, ता. १४ मार्च: मुख्यमंत्री एका कार्यक्रमासाठी येणार असल्याचे वृत्त समोर येताच चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील ढोरवाचा-पिपरी डांबरी रस्त्याचे काम प्रशासनाने जोरात सुरू केले आहे. मात्र, या घडामोडीमुळे स्थानिक गावकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट पसरली आहे. पंधरा वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या या रस्त्याचे काम अचानक सुरू केल्याबद्दल ग्रामस्थांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. पंधरा वर्षांपासून दुर्लक्षित. स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, ढोरवाचा ते पिपरी दरम्यानचा हा रस्ता गेली पंधरा वर्षे प्रचंड जीर्णावस्थेत आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वेळोवेळी ग्रामपंचायतीमार्फत तसेच ग्रामस्थांनी स्वतःहून संबंधित विभागाकडे लेखी निवेदने दिली होती. मात्र, प्रशासनाने  त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे पावसाळ्यात तर हा रस्ता चिखलाचा तलाव बनत असे आणि नागरिकांची प्रचंड कुचंबणा व्हायची. राज्याचे मुख्यमंत्री १४ रोजी (शनि...

डॉ. ज्ञानेश हटवार महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित**विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल गौरव*

*डॉ. ज्ञानेश हटवार महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित*

*विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल गौरव*

अतुल कोल्हे भद्रावती :-
               शैक्षणिक, सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल ऋद्रांश फाउंडेशन मुंबई या संस्थेकडून देण्यात येणारा प्रतिष्ठेचा महाराष्ट्र रत्न पुरस्कार  डॉ ज्ञानेश हटवार भद्रावती यांना देवून सन्मानित करण्यात आले. नुकत्याच  पुणे येथील डॉ  बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनात आयोजित समारंभात मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.

महाराष्ट्र रत्न पुरस्कार वितरण सोहळा डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पुणे येथे नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. ज्ञानेश्वर मोडक माजी अतिरिक्त आयुक्त महानगरपालिका पुणे हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून मा. युनूस पठाण उप आयुक्त महानगरपालिका पुणे , विनोद खैरे अध्यक्ष ऋद्रांश फाउंडेशन मुंबई, जयदेव जाधव मुंबई हे व्यासपीठावर उपस्थित होते.
डॉ ज्ञानेश हटवार हे मागील २४ वर्षापासून यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी भद्रावती येथे विद्यादानाचे कार्य करत आहेत. त्यांनी विद्यादानाचे कार्य करत असतानाच  गोडवाना विद्यापीठ गडचिरोली ची आचार्य पदवी प्राप्त केलेली आहे. अनेक सामाजिक संघटनात ते कार्यरत आहेत. तसेच पत्रकारितेचे क्षेत्रात सुद्धा ते कार्यरत आहेत. त्यांच्या या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ऋद्रांश फाउंडेशन  मुंबई या संस्थेच्या वतीने महाराष्ट्र रत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला .

डॉ ज्ञानेश हटवार यांचा विविध शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक उपक्रमात सहभाग असतो.  त्यांच्या या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय   कार्याची दखल घेऊन ऋद्रांश फाउंडेशन  मुंबई या संस्थेकडून प्रतिष्ठेचा "महाराष्ट्र रत्न" पुरस्कार पुणे येथील  कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते देवून सन्मानित करण्यात आले. त्या बद्दल भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती चे अध्यक्ष डॉ विवेक शिंदे, सचिव डॉ कार्तिक शिंदे, सहसचिव डॉ विशाल शिंदे, प्राचार्य डॉ जयंत वानखेडे, डॉ सुधीर मोते समस्त प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मित्र मंडळींनी त्यांचे  अभिनंदन केले. तसेच सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Comments