*माढेळी-धानोरा रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात**पावसाळा असल्याने जीवितहानी टाळण्याकरीता नादुरुस्त रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करावी : रविंद्र शिंदे*

*माढेळी-धानोरा रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात*

*पावसाळा असल्याने जीवितहानी टाळण्याकरीता नादुरुस्त रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करावी : रविंद्र शिंदे* 

वरोरा:- 
तालुक्यातील माढेळी ते धानोरा रस्त्याची झालेली अत्यंत दयनीय अवस्था बद्दल शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) 75-वरोरा विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे, युवासेना जिल्हा अधिकारी रोहन कुटेमाटे तसेच तालुका प्रमुख दत्ता बोरेकर यांच्या मार्गदर्शनात युवासेना विधानसभा प्रमुख अभिजीत कुडे यांनी शासनाविरोधात वेगवेगळी आंदोलन करीत, निवेदन देत तसेच पाठपुरावा केल्यामुळे माढेळी-धानोरा रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात झाली.
तसे बघता माढेळी बाजारपेठ असून याक्षेत्राला अनेक गावे जोडलेली आहे. सर्वच गावांच्या रस्त्याची अवस्था एकदम दयनिय झालेली आहे व प्रशासन झोपलेले होते. गावकऱ्यांना होत असलेला त्रास बघून झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्याकरीता शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) 75-वरोरा विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनात युवासेना प्रमुख अभिजीत कुडे यांनी गावकऱ्यांना सोबत घेवून आगळेवेगळे आंदोलने केलेत. यात प्रामुख्याने रस्त्यातील खड्यात झोपा काढा आंदोलन, रस्त्यातील खडयात झाडे लावा आंदोलन याव्दारे प्रशासनाला जागे करण्याकरीता आंदोलनाच्या माध्यमातून धारेवर धरले. सतत निवेदने दिली व पाठपुरावा सुध्दा अभिजित कुडे यांनी केला. याचेचे फलीत म्हणजे माढेळी-धानोरा रस्त्याच्या डांबरीकरणाला प्रशासनाने सुरुवात केली व अभिजीत कुडे यांच्या आंदोलनास यश मिळाले.
 तालुक्यातील रस्ते तसेच माढेळी क्षेत्रातील बहुतांश रस्त्यांची अवस्था अजून ही खराब असल्यामुळे लोकांना जीव मुठीत घेवून दिवस रात्रो प्रवास करावा लागत आहे. पावसाळयाचे दिवस असल्यामुळे खराब रस्ता, रस्त्यात खड्डे यामुळे अपघात होवून लोकांचे जीव जाण्याची वेळ असून प्रशासन अजूनही गंभीर नसल्याचे अभिजित कुडे म्हणाले. झोपलेल्या सुस्त प्रशासन यांना जागे करण्यासाठी परत आंदोलने करण्याची गरज पडल्यास आंदोलन करु असा ईशारा युवासेना विधानसभा प्रमुख अभिजीत कुडे दिला आहे.
पावसाळयाचे दिवस बघता तालुक्यातील शेगाव, उखर्डा, हीवरा, चिकणी ते महाडोळी, गीरसावळी  या रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय असून गावकऱ्यांचे खराब रस्त्यामुळे अपघात होव नये तसेच प्राणहाणी वाचविण्याकरीता प्रशासनाने तात्काळ दखल घेत खड्डे बुजवून तात्काळ रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात यावे अशीही मागणी केलेली आहे.
माढेळी ते धानोरा रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात झाल्यामुळे गावकऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण असून शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) 75-वरोरा विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे तसेच युवासेना प्रमुख अभिजीत कुडे यांचे आभार व्यक्त केले.

Comments