कारची टिप्परला मागून धडक एक ठार, दोन गंभीर* वरोडा : शाम ठेंगडी

*कारची टिप्परला मागून धडक एक ठार, दोन गंभीर* 
वरोडा : शाम ठेंगडी 

      चंद्रपूर नागपूर राज्य मार्गावरून जात असलेल्या एका मालवाहू टिप्परला कॉलीस चार चाकी वाहनाने मागून जोरदार धडक  दिल्याने कॉलीसमधील एक जण ठार तर दोघे जखमी झाले.
     ही घटना येथून बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या चंद्रपूर नागपूर महामार्गावरील ते टेमूर्डा गावाजवळ शुक्रवार 28 जून रोजी तीन वाजताच्या सुमारास घडली. चंद्रपूर येथील पाहणी दौरा आटोपून रेल्वेचे अधिकारी कारने नागपूरला परतत असताना हा अपघात झाला. एम एच 31 ए जी 93 51 क्रमांकाच्या काॅलीस कारने रेल्वेचे दोन अधिकारी नागपूरला जात होते. याचवेळी जी जे 12 बी वाय 7244 क्रमांकाचा टिप्परही नागपूरच्या दिशेने जात होता.
       टिप्परच्या मागून  जात असलेल्या कारने समोर जात असलेल्या मालवाहू टिप्पर ला जोरदार धडक दिली.  यावेळी कॉलेजमध्ये बसलेले सुरेंद्रसिंग कर्तारसिंग चव्हाण वय 50 राहणार नागपूर यांचा जागीच मृत्यू झाला तर बबलू डोगर वय 50 व एस व्यंकटेश राव वय 50 राहणार नागपूर हे दोघे गंभीररीत्या जखमी झाले.अपघातानंतर जखमींना येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आल्यानंतर त्यांना पुढील उपचारार्थ नागपूरला हलविण्यात आले आहे.
               दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांचा शुक्रवारी चांदा फोर्ट येथे पाहणी दौरा होता. पाहणी दौरा आटपून सदर रेल्वेचे अधिकारी नागपूरकडे परतत होते.अपघातात मृत्यू पावलेले रेल्वेचे अधिकारी सुरेंद्र सिंग हे नागपूर येथील नागपूरच्या मोतीबाग पीआर एस मध्ये कार्यरत होते. तर जखमी झालेले व्यंकटराव बाबू हे कारचे चालक तर बबलू डोगर हे  नागपूर रेल्वेचे अधिकारी आहेत. जखमींना नागपूरच्या किंग्जवे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वरोडा पोलीस घटनेची चौकशी करीत आहेत.

Comments