डोंगरगाव खडी येथील शेतकऱ्याची आत्महत्या*

*डोंगरगाव खडी येथील शेतकऱ्याची आत्महत्या*

अतुल कोल्हे भद्रावती :-
             तालुक्यातील मौजा डोंगरगाव खडी येथील शेतकरी विजय मारोती बोथले रा. डोंगरगाव खडी पोस्ट डोंगरगाव तह भद्रावती जिल्हा चंद्रपूर वय 50 वर्ष धंदा शेती यांनी काल दिनांक 22/6/2024 रोजी पेरणीच्या हंगामा वेळी लागवडी करिता व इतर लोकांच्या कर्जापाई अखेर  पाण्यात बुडून आत्महत्या केली.
त्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. 
मृतकाला 6 एकर जमीन चोपण रिट सर्वे क्र. 76/2 असून त्यावर सीडीसी बँक नंदोरी, सोसायटी डोंगरगाव खडी चे 200000 दोन लाखाचे व इतर काही लोकांकडून कर्ज घेतले होते.
त्यांचे मागे त्यांची पत्नी गिरजा विजय बोथले वय 45 वर्ष, मुलगा आशिष विजय बोथले, 31वर्ष, अशोक विजय बोथले 28 वर्ष, व आई  व वडील असा मोठा परिवार आहे.

Comments