चंद्रपूर जिल्ह्याचे शिवसेनाप्रमुख पद बदलल्याने जिल्हाप्रमुखाची नाराजी.जिल्हाप्रमुखासह कार्यकर्ते मुंबईला रवाना.

चंद्रपूर जिल्ह्याचे शिवसेनाप्रमुख पद बदलल्याने जिल्हाप्रमुखाची नाराजी.

जिल्हाप्रमुखासह कार्यकर्ते मुंबईला रवाना.

वरोरा 
चेतन लुतडे वरोरा 

 शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) गटाच्या वतीने वरोरा विधानसभा व चंद्रपूर विधानसभा क्षेत्राकरिता जिल्हाप्रमुख म्हणून रवींद्र शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली या नियुक्तीचा विरोध करत जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांचे समर्थक आक्रमक झाले आहे. निष्ठावंत शिवसैनिक विश्वासात न घेता पक्षश्रेष्ठींनी घेतलेल्या निर्णयाचा सर्व शिवसैनिकांनी जिल्हा कार्यालय समोर निषेध व्यक्त केला.

 वरोरा - भद्रावती विधानसभा शिवसेनेचा गड मानला जातो. या क्षेत्रातील खासदार आमदार शिवसेनेतूनच गेलेले आहेत. पडझड झालेल्या शिवसेनेची जिल्ह्यामध्ये बांधणी करून विधानसभेमध्ये कणखर नेतृत्व उभे करण्यात आले होते. शिवसेनेचाच आमदार या ठिकाणी बनणार अशी आशा येणाऱ्या विधानसभेमध्ये जनतेला लागली होती. राजकारणाचे सर्व समीकरणे जीवतोडे यांच्या बाजूने उभे असताना सुद्धा कुरघोडीचे राजकारण करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या पहिले सुद्धा याच पद्धतीचे राजकारण जिल्ह्यात बऱ्याचदा झाल्याने शिवसेनेवरचा विश्वास कमी झाला असल्याचे मत व्यक्त केले. 
जिल्हाप्रमुख जिवतोडे हे विधानसभा लढविण्यासाठी इच्छुक आहे. मात्र अचानक विधानसभेच्या निवडणुका आधी करण्यात आलेल्या फेर बदलामुळे शिवसेनेना संपवण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप  जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केला आहे.

आता विधानसभेतील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मुंबईसाठी रवाने झाले असून पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर आपली आपबिती सांगणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात शिवसेना उबाठा गटात मोठा राजकीय भूकंप होण्याची चर्चा वर्तविली जात आहे.
******************

Comments