अतुल कोल्हे भद्रावती :-
पतंजली योग समिती भद्रावती तर्फे आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून शहरातील मुर्लीधर पाटील गुंडावार लान येथे दिनांक 21 रोज शुक्रवारला सकाळी आठ वाजता योग साधना तथा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी पतंजली योग समिती भद्रावतीचे अध्यक्ष रमेश मालपाणी, नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रफुल चटकी,सामाजीक कार्यकर्ते धनराज अस्वले, आशाताई देवाळकर, प्रकाश आस्वले आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी योग प्रशिक्षक अनंता मत्ते व सुनील वैद्य यांनी उपस्थित नागरिकांना योगाचे धडे दिले व योगाबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यानंतर एका रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात 38 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्त संकलनासाठी ग्रामीण रुग्णालय भद्रावती येथील वैद्यकीय पथकाने सहकार्य केले. सदर कार्यक्रमाला शहरातील विविध संघटनांचे प्रतिनिधी व नागरिक सहभागी झाले होते. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी पतंजली योग समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.
Comments
Post a Comment