देशाला कलाटणी मिळणारा निर्णय लागणार
काँग्रेस लोकसभा उमेदवार प्रतिभाताई धानोरकर
भाजप पक्ष निवडून आल्यास मोठ्या प्रमाणात लोकसभेचा विकास होणार.
वरोरा
चेतन लुतडे
चंद्रपूर -वणी- आर्णी मतदार संघातील लोकसभेची निवडणूक निकाल ४ जूनला लागत आहे. 24 तासानंतर या लोकसभेचा खासदार कोण हे ठरणार आहे. चंद्रपूर येथे मतमोजणी करण्यात येणार असून ही निवडणूक चुरशीची ठरणार आहे.
काँग्रेस तर्फे आ.प्रतिभाताई धानोरकर या खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या पत्नी आहेत. तर भाजपाचे बलाढ्य आमदार तथा पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्यासोबत थेट लढत पाहायला मिळाली.
एक्झिट पोल नुसार चंद्रपूर आर्णी क्षेत्रातील काँग्रेस आघाडीवर असल्याचे चिन्ह दिसत आहे. संपूर्ण भारतामध्ये भाजपाची सत्ता येत असताना चंद्रपूर आर्णी क्षेत्रात लोकसभेचा उमेदवार काँग्रेसचा येणार अशी चिन्हे दिसत आहे. तर महाराष्ट्रात काँग्रेस प्रणित महायुतीच्या सीटा वाढतील असे संकेत दिसत आहे.
लोकसभेच्या दोन्ही उमेदवाराची मेहनत सुद्धा तेवढीच मोठी आहे. या लोकसभा क्षेत्रात विजय वडेट्टीवार , वामनराव चटप, नरेश पूगलिया ,कासावार, सुभाष धोटे, राजू भाऊ उंबरकर, शोभाताई फडणवीस, हंसराज अहिर, रायपूरे,मोघे यासारखे अनेक मातब्बर नेते आहेत. मात्र या दोघांमध्ये कोणाचीही स्वतंत्र लढण्याची हिंमत झाली नाही. त्यामुळे राजकारणातील अस्तित्वाची लढाई या लोकसभेत पाहायला मिळाली.
बलाढ्य भाजपच्या रणनीतीला भेदून काँग्रेस महिला उमेदवाराने मात द्यावी ही गोष्ट सर्वसामान्य भाजप कार्यकर्त्यांना पचनी पडत नाही.
भाजप पक्ष सत्तेत असून स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, हेवी वेट नेता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांनी अर्थमंत्री राहिलेले आमदार सुधीर मुनगंटीवार यांची सीट येण्सायाठी सर्वतोपरी प्रयत्न केला आहे. यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील संघाची यंत्रणा वाॅर रूम तयार करून सुधीर भाऊना निवडून आणण्यासाठी यथाशक्ती प्रयत्न करीत होते. जिल्ह्यात सुधीर भाऊंना चॅलेंज नाही अशी ही वक्तव्य करण्यात आले आहे . ते विजयी झाले तर संघाच्या खऱ्या कार्यकर्त्यांचा विजय असेल.
याउलट काँग्रेस महिला उमेदवार प्रतिभाताई धानोरकर आत्ताच दुःखातून सावरल्या तोच निवडणुका जाहीर झाल्या. तसा वेळ सुद्धा कमी होता. खासदार बाळूभाऊ धानोरकर यांचे बाळकडू घेऊन निर्माण झालेले नेतृत्व भाजपाच्या बलाढ्य रणनीतीला भेदून विजय होण्याच्या मार्गावर उभी आहे. ताईंनी केलेल्या सुश्म नियोजनाच्या रणनीतीचा विजय ठरू शकतो. एकही मोठी सभा न घेता. प्रत्येक गावात जाऊन भेटी देऊन आपली ओळख निर्माण करून दिली. विरोधी पक्षाच्या मातब्बरांना आपल्या शैलीने चुपचाप घरीच बसवले. साम-दाम-दंड-भेद सगळ्या उपाययोजना अमलात आणून जास्तीत जास्त मतदान काँग्रेसच्या पारड्यात ओढून आणले. जात हा जरी फॅक्टर असला तरी असे अनेक फॅक्टर्स जमा करून लोकसभेची निवडणूक जिंकणे ही एक कलाच आहे. त्यामुळे जर लोकसभेमध्ये प्रतिभाताई धानोरकर विजयी झाल्यास देशाला महिला मुसद्दी राजकारणी , संसदपटू मिळणार यात काही शंका नाही.
वंचित आघाडी तर्फे असा कोणताही संघर्ष दिसून आला नाही. मात्र नोटा किती वोट घेणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. एकीकडे मोदीची नाराजगी होती. तर दुसरीकडे खासदार बाळूभाऊ धानोरकर असताना काही क्षेत्रांमध्ये कामे न झाल्याने तेथील नाराजगी. यामुळे मतदारांनजवळ सबळ तिसरा ऑप्शन नसल्याने नोटा मागील लोकसभेपेक्षा जास्त मते घेऊ शकतील .
विजय दोघांमधून एकाचा निश्चित आहे. लोकसभेतील सर्वसामान्य जनता नवनियुक्त खासदार यांच्याकडून जनतेची कामे मोठ्या प्रमाणात व्हावी हीच इच्छा व्यक्त करीत आहे.
एक्झिस्ट फोलनुसार काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभाताई धानोरकर विजय होतील असा अंदाज व्यक्त केला आहे.
Comments
Post a Comment