कॅन्सरशी झुंज देणाऱ्या रोहीला ट्रस्टचा आधार; ‘बाबा आमटे आरोग्य अभियान’ अंतर्गत मदतीचा हातमाणुसकी जपणाऱ्या उपक्रमातून १० वर्षीय चिमुकलीच्या उपचारांना बळ

कॅन्सरशी झुंज देणाऱ्या रोहीला ट्रस्टचा आधार; ‘बाबा आमटे आरोग्य अभियान’ अंतर्गत मदतीचा हात माणुसकी जपणाऱ्या उपक्रमातून १० वर्षीय चिमुकलीच्या उपचारांना बळ बातमी: चंद्रपूर : सामाजिक बांधिलकी जपत कार्यरत असलेल्या स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट, चंद्रपूर तर्फे कॅन्सरशी झुंज देणाऱ्या १० वर्षीय कुमारी रोही सिंह हिला मदतीचा हात देण्यात आला आहे. ‘श्रद्धेय बाबा आमटे आरोग्य अभियान’ अंतर्गत ही मदत करण्यात आली असून, तिच्या उपचारांसाठी महत्त्वाचे सहकार्य मिळाले आहे. मुळचे उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यातील नागेंद्र सिंह हे सध्या नागपूर येथे उदरनिर्वाहासाठी वास्तव्यास आहेत. त्यांची अल्पवयीन मुलगी रोही सिंह हिला हाडांचा कॅन्सर (Bone Cancer) झाला असून, या गंभीर आजारामुळे संपूर्ण कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. अशा कठीण परिस्थितीत ट्रस्टने पुढाकार घेत तिच्या उपचारांसाठी आर्थिक तसेच नैतिक आधार दिला आहे. या उपक्रमातून केवळ आर्थिक मदतच नव्हे, तर एका निरागस मुलीला नव्याने जगण्याची आशा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. रोही ही या आजारावर मात करून पुन्हा आनंदाने जीवन...

फुकट्या प्रवाशांकडून १३ दिवसांत एक कोटी ३९ लाखांचा दंड वसूल , मध्य रेल्वेच्या नागपूर अंतर्गत बल्लारशाह रेल्वे स्थानकासह ९२ रेल्वे स्थानकावर कारवाई

फुकट्या प्रवाशांकडून १३ दिवसांत एक कोटी ३९ लाखांचा दंड वसूल , मध्य रेल्वेच्या नागपूर अंतर्गत बल्लारशाह रेल्वे स्थानकासह ९२ रेल्वे स्थानकावर कारवाई

चंद्रपूर 
अकूंश अवथे 20/6/24
फुकट्या प्रवाशांकडून रेल्वेद्वारे 13 दिवसांत एक कोटी ३९ लाखांचा दंड वसूल करण्यात आलाय. मध्य रेल्वेच्या नागपूर अंतर्गत बल्लारशाह रेल्वे स्थानकासह ९२ रेल्वे स्थानकावर ही कारवाई करण्यात आली. नियम कितीही कडक केले तरी रेल्वेतून फुकट प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याचे वास्तव दिसून येत आहे. रेल्वेच्या विशेष मोहिमेत हा दंड वसूल करण्यात आला. यामध्ये बल्लारशाह मार्गाचाही क्रमांक अव्वल ठरला आहे. तिकीट तपासणी मोहिमेत मध्य रेल्वे नागपूरच्या सर्व तिकीट तपासणी निरीक्षकांनी सहभाग घेतला. या कालावधीत प्रत्येक रेल्वेची कसून तपासणी करण्यात आली. यामुळे रेल्वेला आपल्या महसुली उत्पन्नात महत्त्वपूर्ण टप्पा गाठता आला.


Comments