राष्ट्रीय ओबीसी महासंघ, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अल्पसंख्याक संघटना व इतर सामाजिक संघटनांच्या वतीने नवनिर्वाचित खासदार मा. प्रतिभाताई धानोरकर यांचा भव्य नागरी सत्कारा सोहळा*

*राष्ट्रीय ओबीसी महासंघ, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अल्पसंख्याक संघटना व इतर सामाजिक संघटनांच्या वतीने नवनिर्वाचित खासदार मा. प्रतिभाताई धानोरकर यांचा भव्य नागरी सत्कारा सोहळा*

अतुल कोल्हे भद्रावती :-
                 राष्ट्रीय ओबीसी महासंघ, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अल्पसंख्याक संघटना आणि इतर सामाजिक संघटनांच्या वतीने चंद्रपूर लोकसभेच्या नवनिर्वाचित खासदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर यांच्या भव्य नागरी सत्काराचे आयोजन 22 जून 2024 रोजी प्रियदर्शनी सभागृहात करण्यात आले आहे. चंद्रपूर दुपारी 12.00 वाजता. प्रतिभा धानोरकर मोठा विजय मिळवून देण्यात सर्व ओबीसी संघटना, अनुसूचित जाती-जमाती, अल्पसंख्याक संघटना आणि सामाजिक संघटनांनी मोठी भूमिका बजावली होती. त्यामुळे आता त्यांचे भव्य नागरी सत्कार करून गौरव करण्यात येत आहे. या कार्यक्रमात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉ.बबनराव तायवाडे, नागपूर विभागाचे पदवीधर आमदार अभिजीत वंजारी व नागपूर विभागाचे शिक्षक आमदार सुधाकर अडाबळे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील तमाम जनतेने या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून नवनिर्वाचित खासदाराचे स्वागत करावे, असे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे  महा सचिव सचिन राजूरकर व सर्व आयोजकांनी केले आहे.

Comments