वरोरा चिमूर मार्गावरील सालोरी जवळ अपघात तीन जण गंभीर जखमी.

वरोरा चिमूर मार्गावरील  सालोरी जवळ अपघात 
तीन जण गंभीर जखमी.

वरोरा 
चेतन लुतडे 
वरोरा येथील सलोरी गावाजवळ अपघात झाल्याने तीन जण गंभीर जखमी असल्याची घटना घडली आहे. 
चिमूर वरोरा महामार्गाचे काम गेल्या कित्येक वर्षापासून सुरू आहे. यादरम्यान बऱ्याच प्रवाशांचे जीव सुद्धा गेले आहे. मात्र प्रशासकीय यंत्रणेला याचा कोणताही फरक अजून पर्यंत जाणवत नाही आहे. 

शुक्रवार संध्याकाळी नऊ वाजताच्या सुमारास बेलोन कार  ला  मागून येणाऱ्या कारने धडक दिल्याने चंद्रपूर येथील डॉक्टर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत .या घटनेला जबाबदार महामार्गावरील अपूर्ण काम असल्याची प्राथमिक माहिती कळत आहे. अपघात इतका भीषण होता की गंभीर प्रवाशांना काढण्यासाठी कारचे दार तोडून बाहेर काढावे लागले.

यावीळी वरोरा येथील माजी सभापती राजू चिकटे व त्यांचे मित्र अक्षय बोदगूलवार या ठिकाणावरून जात होते. अपघाताचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ  108 क्रमांकाला फोन करून या संबंधात माहिती दिली. व तोपर्यंत या कारचा दरवाजा तोडून तीनही प्रवाशांना बाहेर काढण्याचा यशस्वी प्रयत्न केला.  लगेच तिघांनाही वरोरा येतील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. उपजिल्हा रुग्णालय येथे पुढील व्यवस्था नसल्याने तिघांनाही चंद्रपूर येथे जिल्हा रुग्णालयात तात्काळ हलवण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस करिता आहे.

सिमेंट रोड ज्या ठिकाणी कटून आहे त्या ठिकाणी मार्गदर्शक सूचना दिलेल्या नाही किंवा साधा रेड कलरचा झेंडा सुद्धा लावण्यात आलेला नाही. त्यामुळे गंभीर स्वरूपाचे अपघात वारंवार होत आहेत . या महामार्गावर रोज महामार्गावरील पोलीस/ ट्राफिक पोलीस मोठ्या प्रमाणावर आपले काम दाखवित असतात मात्र साधा एखादा बोर्ड किंवा रेडियम लावावा इतपत जाणीव सुद्धा  पोलिसांना किंवा रस्ता महामार्ग विभागाला , कॉन्ट्रॅक्टर ला  नाही याचे आश्चर्य वाटतं.

Comments