*रेल्वे खाली येऊन एकाच वेळेस दोन युवकाची आत्महत्या*

*रेल्वे खाली येऊन एकाच वेळेस दोन युवकाची आत्महत्या*

अतुल कोल्हे भद्रावती -  
                 तालुक्यातील मुरसा येथे रेल्वे पटरीवर दोन युवकांनी रेल्वे खाली येऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी ११ वाजता उघडकीस आली या प्रकरणी भद्रावती पोलिसांनी मार्ग दाखल केला आहे. मात्र या दोन्ही युवकांची ओळख पटली नाही.
 मुरसा रेल्वे पटरीवर दोन युवक रेल्वेखाली आल्याची माहिती रेल्वे चालकांनी रेल्वे स्टेशनला दिली त्यानुसार भद्रावती पोलीस घटनास्थळी दाखल झाले मृतक हे २५ ते ३० वयोगटातील असून ते अमरावती जिल्ह्यातील मेळघाट येथील असल्याचे पोलिसांनी सांगितले मात्र मृतकाचे नाव स्पष्ट झाले नाही एकाच वेळी दोन युवकांनी रेल्वेखाली येऊन आत्महत्या का केली हे मोठे रहस्य असून या दोघांची ओळख पटल्यावरच घटनेचा उलगडा होईल असे ठाणेदार बिपिन इंगळे यांनी सांगितले.

Comments