वनोजा जवळ भरधाव ट्रकने मोटारसायकलला धडक दिली; एक जागीच ठार, एक जखमी

वनोजा जवळ भरधाव ट्रकने मोटारसायकलला धडक दिली; एक जागीच ठार, एक जखमी वरोरा, दि. 18 एप्रिल – येथील वनोजा गावाजवळ रात्री साडेनऊच्या सुमारास भरधाव व निष्काळजीपणे चालविलेल्या अज्ञात ट्रकने मोटारसायकलला समोरासमोर धडक दिली. या अपघातात मोटारसायकलस्वार चेतन किसनराव चावरे (वय ३६, रा. खौरी, ता. राळेगाव, जि. यवतमाळ) यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेले संदेश बुरडकर (वय ३५) जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, चेतन चावरे व संदेश बुरडकर हे मोटारसायकल (क्र. MH 36 D 5653) ने वरोराहून खौरीकडे जात होते. माढळीकडून वरोराकडे येणाऱ्या ट्रक चालकाने वेग व निष्काळजीपणा करून त्यांच्या बाईकला समोरून जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की, चेतन चावरे यांचे डोके फुटून मेंदू बाहेर आला व त्यांचा मृत्यू झाला. जखमी संदेश बुरडकर यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृताचे काका विजय रामाजी क्षीरसागर (रा. दहेगाव) यांनी वरोरा पोलिसांत तोंडी रिपोर्ट दिला आहे. अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असून, पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. अधिक तपास सुरू आहे.

*निप्पॉन डेन्ड्रो विज प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाची दखल**प्रकल्पग्रस्तांची बैठक लागेपर्यंत सिमा रेखा आखणीचे काम राहील बंद*

*निप्पॉन डेन्ड्रो विज प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाची दखल*

*प्रकल्पग्रस्तांची बैठक लागेपर्यंत सिमा रेखा आखणीचे काम राहील बंद*

जाहिरात 
              एकच नारा किशोरभाऊ हमारा
*******************************************
                 जोपर्यंत प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत निप्पॉन डेन्ड्रो विज प्रकल्पाच्या जागेवर खाजगी कंपन्यांचे कोणतेही काम होवू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेवून निप्पॉन डेन्ड्रो विज प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी काल (दि.१५) ला आंदोलन केले होते व स्थानिक पोलीस स्टेशनला एम.आय.डी.सी. तथा खाजगी प्रकल्पाविरोधात तक्रार दाखल केली होती.

या आंदोलन व तक्रारीची दखल घेवून ठाणेदार बिपिन इंगळे यांनी शेतकऱ्यांची बाजु घेत जोपर्यंत एम.आय.डी.सी., खाजगी प्रकल्प अधिकारी व जिल्हा प्रशासन यांचेसह प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची बैठक लागून तोडगा निघत नाही, तोपर्यंत काम सुरु होवू देणार नसल्याचे सांगितले.

तथा एम.आय.डी.सी.चे अध्यक्ष मधुसूदन रुंगठा यांनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या बाजूने असल्याचे सांगितले. प्रकल्पग्रस्त शेतकरी प्रतिनिधी वासुदेव ठाकरे यांचेशी बोलताना रुंगठा यांनी आश्वासन दिले की, लवकरच आधी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसोबत बैठक घेवू व त्यांच्या मागण्यांवर चर्चा करू.

सुमारे २८ वर्षापूर्वी ११८३ हेक्टर २३ आर इतकी जमीन प्रस्तावित निप्पॉन डेन्ड्रो विज प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली होती. त्यावेळी जमिनीचा अत्यल्प मोबदला देण्यात आला होता. प्रकल्पात नोकरी देण्याची कबुली होती. परंतु त्या ठिकाणी आजपावेतो कुठलाही प्रकल्प कार्यान्वीत झाला नाही. स्थानिकांच्या शेत्याही गेल्या व नोकरी देखील मिळाली नाही. परिणामी प्रकल्पग्रस्तांची एक पिढी यात बरबाद झाली.

जाहिरात 
गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी रवीभाऊ उतरणार आमदारकीसाठी.
********************************************
प्राप्त झालेल्या माहिती नुसार या जमिनीवर दोन प्रकल्प उभारण्यात येणार आहे. तर नव्याने एमआयडीसी व खाजगी कंपनी ने शेतकऱ्यांसोबत करार करावा, अशी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची मागणी आहे.

या आंदोलनात मौजा विजासन, रुयाड (रिठ), पिपरी (देश.), टोला, चारगांव, लोणार (रिठ) तेलवासा, कुनाडा, चिरादेवी व ढोरवासा या गावातील प्रकल्पग्रस्त शेतकरी सहभागी आहेत.

Comments