खेमजई येथे बायोचार निर्मितीला सुरुवात

खेमजई  येथे बायोचार  निर्मितीला सुरुवात  20एप्रिल2026:- वरोरा तालुक्यातील खेमजई येथे अंबुजा फाउंडेशन व कांचनी फार्मर प्रोडूसर कंपनी चिनोरा यांच्या संयुक्त विद्यमाने बायोचार निर्मितीला आजपासून सुरुवात करण्यात आली आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन कांचनी फार्मर प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष यशवंत सायरे यांच्या हस्ते करण्यात आले.  अंबुजा हवामान बदल प्रकल्पाचे समन्वयक किशोर कोरे यांनी या प्रकल्पाबद्दल मार्गदर्शन करून बायोचार  निर्मितीचे प्रात्यक्षिक करून दाखवले.तसेच बायोचार निर्मिती करताना घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर असे मार्गदर्शन केले. मंडळ कृषी अधिकारी विजय काळे यांनी बायोचार वापरण्याचे शेतकऱ्यांना होणारे फायदे याबद्दल मार्गदर्शन केले .  यावेळी कांचनी फार्मर प्रोडूसर कंपनीचे संचालक बळीरामजी डोंगरकर, अंबुजा फाउंडेशन तालुका समन्वयक विश्वास गुल्हाने, ग्राम संघाचे अध्यक्ष वंदना साळवे, उपसरपंच चंद्राहास मोरे, प्रमोद गायकवाड रमेश बावने, ग्रामपंचायत सचिव मेघश्याम येंचलवार, विनायक बावणे इत्यादी उपस्थित होते.या प्रकल्पाला नायब तहसीलदार गिरीष बोर्डे यांनी भेट देऊ...

वनोजा जवळ भरधाव ट्रकने मोटारसायकलला धडक दिली; एक जागीच ठार, एक जखमी

वनोजा जवळ भरधाव ट्रकने मोटारसायकलला धडक दिली; एक जागीच ठार, एक जखमी

वरोरा, दि. 18 एप्रिल – येथील वनोजा गावाजवळ रात्री साडेनऊच्या सुमारास भरधाव व निष्काळजीपणे चालविलेल्या अज्ञात ट्रकने मोटारसायकलला समोरासमोर धडक दिली. या अपघातात मोटारसायकलस्वार चेतन किसनराव चावरे (वय ३६, रा. खौरी, ता. राळेगाव, जि. यवतमाळ) यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेले संदेश बुरडकर (वय ३५) जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, चेतन चावरे व संदेश बुरडकर हे मोटारसायकल (क्र. MH 36 D 5653) ने वरोराहून खौरीकडे जात होते. माढळीकडून वरोराकडे येणाऱ्या ट्रक चालकाने वेग व निष्काळजीपणा करून त्यांच्या बाईकला समोरून जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की, चेतन चावरे यांचे डोके फुटून मेंदू बाहेर आला व त्यांचा मृत्यू झाला. जखमी संदेश बुरडकर यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मृताचे काका विजय रामाजी क्षीरसागर (रा. दहेगाव) यांनी वरोरा पोलिसांत तोंडी रिपोर्ट दिला आहे. अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असून, पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. अधिक तपास सुरू आहे.

Comments