अतुल कोल्हे भद्रावती :-
स्थानिक सुमठाना येथील मल्हारी बाबा सोसायटी येथे बाल संस्कार शिबिर सुरू असून या शिबिरात 100 विद्यार्थी सहभागी झाले असून या शिबिराला येथील इनरव्हील क्लब क्लब ने भेट देऊन सहभागी विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वितरण करण्यात आले.
सदर शिबिर सकाळी सहा वाजता पासून सुरू होत असून या शिबिरात योगा पासून तर लाठी- काठी, सांस्कृतिक कार्यक्रम तर दुपारी योग्य मार्गदर्शन, संस्काराचे आयोजन करण्यात येत असून हरिपाठ घेऊन दिवसाची सांगता करण्यात येते. इनरव्हीलच्या या वितरण समारंभाला सुनंदा खंडाळकर, वर्षा धानोरकर, वंदना धानोरकर, विश्रांती उराडे, तृप्ती हिरादेवे, विभा बेहरे ,कीर्ती गोहणे, शुभांगी बोरकुटे आदींचा सहभाग होता.
Comments
Post a Comment