नीट परीक्षेत झालेल्या घोटाळ्याविरोधात चंद्रपुरात हजारो विद्यार्थी रस्त्यावर, नीट विरोधातील पहिला मोर्चा निघाला चंद्रपुरात

नीट परीक्षेत झालेल्या घोटाळ्याविरोधात चंद्रपुरात  हजारो विद्यार्थी रस्त्यावर, नीट विरोधातील पहिला मोर्चा निघाला चंद्रपुरात

चंद्रपूर 

मेडिकल एंट्रन्स परीक्षा म्हणजेच नीट मध्ये झालेल्या घोटाळ्याविरोधात चंद्रपुरात आज हा हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले. नीट मध्ये झालेल्या गैरप्रकाराच्या विरोधात चंद्रपुरात आज राज्यातील पहिल्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. चंद्रपूर कोचिंग क्लासेस असोसिएशन आणि IMA च्या वतीने हा मोर्चा आयोजित करण्यात आला असून या मध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सामील झाले होते. गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालया पर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होता. मूर्चीकरांनी नीट परीक्षेतील घोटाळ्यासंदर्भात एन टी ए ला समाधानकारक उत्तरे मागितली.

Comments