भद्रावतीत बकरी ईद उत्साहात साजरी*

*भद्रावतीत बकरी ईद उत्साहात साजरी*

अतुल कोल्हे भद्रावती :-
           भद्रावती शहरासह तालुक्यातील मुस्लिम बांधवांतर्फे बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने शहरातील मुस्लिम बांधवांनी दि. 17 रोज सोमवारला सकाळी 8.00 वाजता येथील दुधाळा तलावाजवळील इदगाह सह अन्य ईदगाह तथा मज्जिद मध्ये पवित्र नमाज अदा केली. यावेळी जामा मज्जिदचे इमाम अब्दुल गफार अन्सारी, गरीब नवाज मज्जिदचे इमाम हाफिज मुस्तकीम, सुमठाना ईदगाहचे कौणेन राजा, मदिना मज्जिदचे इमाम मौलाना फारूक आदींनी बकरी ईद ची सविस्तर माहिती देऊन शहरातील मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी मुस्लिम बांधवांनी एकमेकांची गळाभेट घेऊन आपला आनंद व्यक्त केला. यावेळी हाजी बबन शेठ, हाजी जावेद शेख, हाजी शाहिद अली, हाजी शाहिद भाई, हाजी जाकिरभाई हमीदभाई, जाफर शेख, हाजी अब्बास भाई, परवेज शेख, जावेद शेख, रब्बानी शेख, डॉक्टर शकील शेख, इमरान भाई, मुनाज शेख, फय्याज शेख, सिकंदर शेख, पप्पू शेख तसेच तुपेल अहमद आदी उपस्थित होते.

Comments